शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गोवा - महाराष्ट्रातील १६९ मटका दलालांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 00:12 IST

लवकरच दोषारोपपत्र दाखल करणार : डॉ. प्रशांत अमृतकर

कोल्हापूर : पन्नासपेक्षा जास्त मटका, जुगाराचे गुन्हे दाखल असलेला मटकाचालक विजय लहू पाटील (वय ५०, रा. देवकर पाणंद) याच्या मटक्याच्या कनेकशनला पोलीसांनी सुरुंग लावला. गोवा-महाराष्ट्रातील १६४ बुकी चालकांवर कारवाई केली. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात सादर केले जाणार आहे. अशी माहिती करवीर विभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आज दिली. 

इस्पुर्ली ते नागाव मार्गावर सुरेश बाळासो मगदूम यांच्या राहत्या घरामागील खोलीमध्ये एजंट अनिल चौगुले हा राजरोस मटका चालवित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डॉ. अमृतकर यांच्या आदेशानुसार पथकाने छापा टाकून १३ जणांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून मटक्याच्या चिठ्ठ्या, रोकड, ३४ मोबाईल, सहा दुचाकी, असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. या मटक्याचा बुकीमालक विजय पाटील असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार इस्पुर्ली पोलिसांनी त्यालाही अटक  केली. मिळालेल्या मोबाइल वरील कॉल डिटेल्सची माहिती घेतली असता संशयित विजय पाटील याचे महाराष्ट्र-गोवा कनेकशन असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी खोलवर तपास केला असता गोव्यातील लोकांकडून मटक्यासाठी पैसा घेणारे १६९ एजंट निष्पन्न झाले. या सर्वांकडे चौकशी केली असता त्यांनी संशयित पाटील याचे सांगण्यावरुन मटका घेत असल्याची कबुली दिली आहे. आणखी काही एजंट निष्पन्न होण्याची शक्यता आहे. संशयित पाटील अनेक वर्षापासून मटका व्यवसायात आहे. कारवाईचा त्याचेवर कोणताच फरक पडत नसे. कारवाई करुन पोलीसचं हतबल झाले होते. त्याने महाराष्ट्र गोव्यामध्ये बसविलेले कनेकशनच पोलीसांनी उखडून टाकल्याने अवैध व्यावसायीकांच्यात खळबळ उडाली आहे. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसArrestअटक