शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीत गुंडांचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 14:04 IST

जुन्या भांडणाची खुन्नस काढत हातात तलवारी, कोयते आणि काठया घेऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने दिसेल त्याला मारहाण व वाहनांची तोडफोड केली.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीसह तिघे गंभीर जखमीवाकड ठाण्यात सात जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल

वाकड : जुन्या भांडणाची खुन्नस काढत हातात तलवारी, कोयते आणि काठया घेऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने दिसेल त्याला मारहाण व वाहनांची तोडफोड केली. तसेच काहींच्या घरात घुसत संसारोपयोगी वस्तूंची नासधूस करण्यात आली. हा प्रकार वाकड काळखडक झोपडपट्टीत रविवारी (दि २५) रात्री नऊच्या सुमारास घडला. या प्रकाराने झोपडपट्टीवासीय प्रचंड दहशतीखाली आहेत. याबाबत रात्री उशिरा वाकड ठाण्यात सात जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     याप्रकरणी जखमी शांताबाई जाधव (वय ५०, रा काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे तर रस्त्याने जाणा?्यावर करण्यात आलेल्या अंदाधुंद काठी हल्ल्यात शांताबाई यांच्यासह त्यांची नात पूर्वा गुंजाळ (वय ३) या बालिकेसह दिलीप खुळे पेटे (वय ६०) व कळमकर (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा सर्वजण काळाखडक हे जखमी झाले आहेत. तर सहा दुचाकींची देखील तोडफोड करण्यात आली.      तोडफोड आणि मारहाणीवरच ते थांबले नाहीत तर त्या गुंडांनी अमानुषपणाचा कळस करत काहींच्या घरात घुसून संसारपयोगी समान रस्त्यावर फेकले वस्तूंची तोडफोड करीत दहशत माजविली. या प्रकाराने सर्वत्र हाहाकार सुरू झाला. घटनेनंतर दाखल झालेल्या वाकड पोलिसांनी पंचनामा करून आरोपींची नावे देखील मिळविली आहेत.

     सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांताबाई यांचा मुलगा किरण जाधव याच्या दुचाकीचे सीट कव्हर कोणीतरी फाडले त्याचा संशय शेजाºयांवर घेतल्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडणे झाली आणि ती आपापसात मिटली. पण नंतर सर्व काही शांत झाले असताना दोन दिवसांनी रविवारी पुन्हा या भांडणाचे रूपांतर मोठ्या टोळीकडून मारहाण तोडफोडीत झाले.अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र पळापळ सुरू झाली. त्यापैकी आरोपींची चार नावे निष्पन्न आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :wakadवाकडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस