शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकेच्या नावावर तरुणाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 16:55 IST

नालासोपारा पोलिसांनी केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): सदनिकेच्या नावावर २४ वर्षीय तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या व फरार इस्टेट एजंट आरोपीला शुक्रवारी रात्री पकडण्यात नालासोपारा पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीने कोणाची सदनिकेच्या नावावर फसवणूक केली असेल तर त्यांनी कागदपत्रांसोबत पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आव्हान नालासोपारा पोलिसांनी केले आहे. 

भाईंदरच्या संकल्प बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रघुनंदन यादव (२४) या तरुणाची सदनिकेच्या नावावर फसवणूक केली होती. आरोपी रियल इस्टेट एजंट सचिन तरकचंद गाला (४०) याने ३ फेब्रुवारी २०२० मध्ये श्रीप्रस्थातील ड्रीम टॉवरमध्ये २२ लाख ७५ हजार रुपयांना सदनिकेचा व्यवहार केला होता. सदर व्यवहारापोटी रघुनंदन याच्याकडून रोख व धनादेशद्वारे ५ लाख ६१ हजार रुपये घेतले. उर्वरित रकमेचे लोन करून देतो असे आश्वासन देऊन त्यांचे कागदपत्रे घेऊन आशापुरा रियालिटी याच्या पावत्या दिल्या होत्या. ठरलेला सदनिका खरेदीचा व्यवहार पूर्ण केला नाही व घेतलेली रक्कम परत न करता सदनिका खरेदीच्या व्यवहारात विश्वासघात करून फसवणूक केली होती. रघुनंदन याने ८ जुलैला नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. आरोपी तेव्हापासून फरार होता. शुक्रवारी रात्री त्याला पोलिसांनी पकडून अटक केली आहे.

तरुणाच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला शुक्रवारी पकडून अटक केले आहे. शनिवारी वसई न्यायालयात आरोपीला हजर केल्यावर सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - राहुल सोनवणे (पोलीस निरीक्षक, गुन्हे, नालासोपारा पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी