शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

अ‍ॅसिड हल्ला करणारा आरोपी अद्याप मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 8:22 PM

पुरावे नसल्याने पोलिसांपुढे आव्हान, निकटवर्तीयांचे जबाब नोंदविणे सुरू

ठळक मुद्देदोघांच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उपचारापूर्वीच  तिवारी यांचा मृत्यू झाला तर सीमा विश्वकर्मा यांच्या हात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. हा हल्ला वैयक्तिक वैमन्यसातून घडला असावा अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

 

वसई - वसईतील जोडप्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ला प्रकरणी तीन दिवस उलटूनही पोलिसांना कसलाच सुगावा लागलेला नाही. हा हल्ला वैयक्तिक वैमनस्यातून झाला आहे का याबाबत वालीव पोलिसांनी तपास कऱण्यास सुरवात केली असून दोघांच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दहिसर येथील कांदरपाडा येथे राहणारे अविनाश तिवारी (४१) हे सीमा अग्रवाल (३८) मंगळवारी रात्री हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलात जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी आपली दुचाकी विरूध्द दिशेच्या मार्गिकेवरून काढली आणि रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक समोर आलेल्या एका अज्ञात इसमाने दोघांवर अ‍ॅसिड फेकले. तिवारी लगेच जवळच्या पेट्रोलपंपाजवळ गेले आणि तिथे असलेल्या लोकांनी पाणी मारून  अ‍ॅसिडची तीव्रता कमी कऱण्याचा प्रयत्न केला. मात्र ते  अ‍ॅसिडमुळे गंभीर भाजल्याने त्या दोघांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच  तिवारी यांचा मृत्यू झाला तर सीमा विश्वकर्मा यांच्या हात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेया घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप कुठलाही सुगावा मिळालेला नाही. हे दोघे लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये रहात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. घटनेचे सीसीटीव्ही मिळाले नाही. हल्ल्यासाठी वापरलेले अ‍ॅसिड हे तीव्र क्षमतेचे होते. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठिवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात तिवारी आणि विश्वकर्मा यांच्या निकटवर्तियांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. हा हल्ला वैयक्तिक वैमन्यसातून घडला असावा अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVasai Virarवसई विरारcctvसीसीटीव्ही