शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडाची वाकड भागात 'मुळशी पॅटर्न' फेम वरात; पोलिसांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 20:44 IST

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी होता तडीपार

वाकड : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असूनही या कारवाईचा भंग करून वाकड भागात दादागिरी व दहशत करणारा सराईत गुंड संदीप उर्फ बाळ्या भोसले याला वाकड पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने पकडून त्याची परिसरातून धिंड काढली. त्याला आसरा देणाऱ्या घरमालकांनाही कडक समज देण्यात आला या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.संदीप उर्फ बाळ्या भोसले (वय २८, रा.काळाखडक) याच्या विरुद्ध वाकड हिंजवडी हद्दीत बॉडी ऑफेन्सचे गंभीर पाचपेक्षा जास्त गुन्हे असून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना होताच २०१८ साली वाकड पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते तरीही बाळ्या लपून छपून काळाखडक भागात येऊन दहशत निर्माण करत असल्याबाबत वाकड पोलिसांत काही नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या तर बाळ्या याने नुकतेच पहिल्या पत्नीला फसवून दुसरे लग्न केल्याने तिनेही वाकड ठाणे गाठून गाऱ्हाणे मांडले होते.     वाकड ठाण्याचे तपास पथक प्रमुख हरीश माने व त्यांचे पथक बाळाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते त्यातच बाळ्या बुधवारी (दि २७) सायंकाळी ५ वाजता काळा खडक येथे आल्याची खबर हरीश माने यांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन गरीबांचा कर्दनकाळ बनलेल्या बाळ्याची वरात काढून त्याच्यावर कारवाई करण्यात आली, त्याला मदत करणाऱ्या आणि आसरा देणाऱ्या लोकांनाही सक्त ताकीद देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीश माने, पोलीस नाईक बापू धुमाळ, विक्रम जगदाळे, विक्रम कुदळ, सुरज सुतार, नितीन गेंजगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :wakadवाकडPoliceपोलिसArrestअटक