शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी अल्पवयीन मुलाच्या घरावर दगडफेक; येरवड्यातील खुनाच्या घटनेनंतरचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:30 IST

खुनाच्या या गंभीर घटनेमुळे पंचशील नगर परिसरात काही काळ तणाव निर्माण

ठळक मुद्देयाप्रकरणी येरवडा पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून दंगल माजविल्याचा ६ ते ७ जणांवर गुन्हा

पुणे : येरवडा येथील पंचशीलनगरमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून प्रतिक वन्नाळे याचा खून करण्यात आला होता. त्याच्या अंत्यसंस्काराच्यावेळी जमलेल्यांपैकी काही जणांनी यातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या घरावर दगडफेक करुन दरवाजा तोडण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी येरवडापोलिसांनी बेकायदा जमाव जमवून दंगल माजविल्याचा ६ ते ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.प्रतिक हनुमंत वन्नाळे (वय २७) यांचा सोमवारी दुपारी आरोपींबरोबर किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्याच रागातून सोमवारी रात्री ९ वाजण्याच्यासुमारास आरोपींनी प्रतिकला घरातून बोलावून कॉमर्स झोनसमोरील मोकळ्या मैदानात नेऊन कुर्‍हाड व दगडाने मारहाण करुन त्याचा खुन केला होता.याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चार जणांना अटक केली असून चार अल्पवयीनमुलांना ताब्यात घेतले.  पोलिसांनी शवविच्छेदनानंतर प्रतिकचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे  हवाली केला. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याचा मृतदेह पंचशीलनगर येथे आणण्यात आला होता. खुनाच्या या गंभीर घटनेमुळे मंगळवारी सकाळपासूनच पंचशील नगर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी चिडलेल्या काही जणांनी प्रतिक याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मुंजाबा वस्तीतील गल्लीत अल्पवयीन मुलाच्या घरावर हल्ला केला. पत्र्याच्या घरावर दगडफेक केली. घराचा दरवाजा तोडून आतील सामानाची नासधुस केली.याप्रकरणी पोलीस शिपाई अजित मगदुम यांनी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून दंगल माजविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :YerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस