शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

९.६० लाखांच्या लुटमार प्रकरणातील आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 18:56 IST

पोलीस तपासाला यश : महिन्याभरापूर्वी घडली होती घटना

ठळक मुद्देचार आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले. वाशिम शहर पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

वाशिम - शहरापासून जवळच असलेल्या चौपाल सागरच्या व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकाचे दुचाकी वाहन अडवून त्यांना ९.६० लाखांनी लुटल्याप्रकरणी शुभम विठ्ठल जाधव, प्रतीक किसन सूर्य, विठ्ठल भगवान सूर्य, कृष्णा देशमुख (सर्व रा. काटा, ता. वाशिम) या चार आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले. अकोला - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चौपाल सागरचे व्यवस्थापक दर्शन उमाकांत जोशी (वय ३५, रा.नालंदा नगर) आणि सुरक्षा रक्षक राजू हरिभाऊ इंगळे हे दोघे ६ मे २०१९ रोजी दुचाकी वाहनाने चौपाल सागर आणि पेट्रोल पंप व्यवसायाची जमा झाली ९ लाख ६० हजार ६२७ रूपयांची रक्कम बॅगमध्ये भरून एका खासगी बँकेत जमा करण्यासाठी जात होते. यादरम्यान अकोला नाक्यापासून थोड्याच अंतरावरील वाटाणे लॉननजिकच्या टी पॉइंटवर विना क्रमांकाच्या दुचाकीने दर्शन जोशी यांच्या वाहनास धडक दिली. तसेच दोन अज्ञात चोरट्यांनी चौपाल सागरचे व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकास बेदम मारहाण करून त्यांच्याजवळ असलेली पैशाची बॅग पळविली होती. दरम्यान, या दिवसाढवळ्या घडलेल्या या गंभीर घटनेतील आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वाशिम पोलिसांसमक्ष उभे ठाकले होते. त्यानुषंगाने गेल्या महिनाभरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक व शहर पोलीस स्टेशनमधील डी.बी.चे पथक यांनी चोख तपास करून काटा येथील चार आरोपींना गजाआड केले. त्यांच्याविरूद्ध वाशिम शहर पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.या कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बन्सोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, वाशिम पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते, सहायक पोलीस निरीक्षक मुकूंद वाघमोडे, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे, प्रशांत अंभोरे, गणेश बरगे, ज्ञानदेव म्हात्रे, विजय पतंगे, रामकृष्ण नागरे, गोपाल घोडे, गजानन ब्राम्हणे आदिंनी सहभाग नोंदविला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाArrestअटकPoliceपोलिस