अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 22:21 IST2021-01-22T22:20:49+5:302021-01-22T22:21:00+5:30
अचलपूर न्यायालयाचा निकाल, २० हजार रुपये दंड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा कारावास
परतवाडा (अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेतील आरोपीला स्थानिक न्यायालयाने २० वर्षे कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ ए. ए. सईद यांच्या न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला. विजय मनोहर जवंजाळ (रा. रावळगाव, ता.अचलपूर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
विधीसूत्रानुसार, ८ मार्च २०१९ रोजी सकाळी ९ च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी खेळण्यास गेली असता, गावातील समाजमंदिरावळ आरोपी विजय याने पीडिताला तिळाचा लाडू देण्याची बतावणी करून समाजमंदिरात नेऊन बलात्कार केला. आसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उपविभागीय अधिकारी तथा तपासी अधिकारी ए. पी. पालवे यांनी तपास करून अचलपूर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील डी. ए.नवले यांनी करण्यासाठी एकूण ८ साक्षीदार तपासले. पीडिताचे बयाणसोबत वैद्यकीय अधिकारी रश्मी तिखे व डॉ.पी.एच.अळने यांची साक्ष ग्राहय धरून ९ वर्षांच्या पीडितावर झालेला अत्याचार सिध्द झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.ए.सईद यांनी आरोपी विजय जवंजाळ याला भादंविचे कलम ३७६ (अ)(ब) व ६ बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याप्रमाणे २० वर्षे सक्तमजुरीची व २० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. तसेच पीडिताला नुकसान भरपाईचा आदेश दिला. सदर प्रकरणात आसेगावचे पोलीस कर्मचारी सतीश बुंदे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले