शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लज्जास्पद! ६४ वर्षीय सासूवर जावयाने केला अत्याचार; जबरदस्ती दारु पाजल्याचाही आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 12:51 IST

आर्वी येथील घटनेने खळबळ

वर्धा : मद्यधुंद जावयाने ६४ वर्षीय वृद्ध सासूला जबरदस्ती दारू पाजून बळजबरी अत्याचार केल्याची घटना आर्वी शहरात घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून या लज्जास्पद घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.

वृद्धेची मुलगी आणि पती सचिन यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता. त्यामुळे वृद्धेची मुलगी नागपूर येथे तिच्या मोठ्या वडिलांकडे गेली होती. याचाच फायदा घेवून जावयी सचिन हा घरी आला त्याने वृद्धेच्या मुलाला पनीर आणण्यासाठी बाहेर पाठविले. घरी कुणी नसल्याचे पाहून जावयी सचिनने वृद्ध सासूला जबरदस्ती दारू पाजली. सासूने दारू पिण्यास नकार दिल्यावरही सचिनने जबरदस्ती दारू पाजली. काही वेळानंतर मुलगा पनीर घेवून घरी आला.

जावयी सचिनने स्वत:च्या हाताने पनीरची भाजी बनविली. त्यानंतर दोघांनी जेवण केले. सचिनने वृद्ध सासूच्या मुलाला पुन्हा खर्रा आणण्यासाठी बाहेर पाठविले. मुलागा घराबाहेर पडताच सचिनने वृद्ध सासूवर बळजबरी अत्याचार केला. मुलगा खर्रा घेवून आल्यावर सचिनने खर्रा घेवून निघून गेला. वृद्ध सासूने ही बाब दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाला सांगितली. तसेच नागपूर येथे गेलेल्या तिच्या मुलीला दुरध्वनीवरून संपर्क करून सांगितली. त्यानंतर वृद्ध सासूने याप्रकरणी आर्वी पोलिसांत धाव घेत जावयी सचिन वरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून ३७६.३७६ (२),(एन) या भादविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.यापूर्वीही केला होता अत्याचार....

सचिन आणि वृद्धेच्या मुलीचा २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. जावयी सचिन हा सेंट्रींगचे काम करायचा. मात्र, दोघांमध्ये नेहमीच घरगुती कारणातून वाद व्हायचे. यापूर्वीही मुलगी बाहेरगावी गेली असता डिसेंबर २०१९ मध्ये जावयी सचिन याने घरात प्रवेश करून वृद्ध सासूवर बळजबरी अत्याचार केला होता. मात्र, बदनामी खातर वृद्धेने ही बाब कुणालाही सांगितली नव्हती. मात्र, पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने वृद्धने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसRapeबलात्कारMaharashtraमहाराष्ट्र