शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चोरी करणाऱ्या आरोपीला लाखोंच्या मुद्देमालासह अटक, तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 18:17 IST

मंगेश कराळे नालासोपारा :- तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीला १५ तोळ्यांचे सोन्याच्या दागिन्यांसह अटक केले आहे. ...

मंगेश कराळे

नालासोपारा :- तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीला १५ तोळ्यांचे सोन्याच्या दागिन्यांसह अटक केले आहे. पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला असून पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी शुक्रवारी दिली आहे. 

मोरेगाव येथील पिलाजी पाटील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुनीती वेप्सी रीडर (५१) या महिलेच्या घरी २८ फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजा वाटे आत प्रवेश करत मोबाईल फोन, पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, सोन्याच्या पट्ट्या, कानातील फुल, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे लॉकेट, मंगळसूत्र, नाकातील नथनी असा एकूण ४ लाख ८९ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. तुळींज पोलिसांनी चोरट्यां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. 

नमुद गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून त्यांच्या राहते घरी़ काम करणारा मुलगा उत्तम ज्ञानेश्वर खंदारे यास चौकशीकामी ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्राचे अनुषंगाने विचारपुस केली असता तो असमाधानकारक तसेच दिशाभुल करणारी उत्तरे देत होता. तसेच पोलीसांच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्याकरीता उत्तमने फिनेल पिवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून तपास प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. तांत्रिक विश्लेषणाव्दारे उत्तम हा गुन्हा घडलेल्या दिवशी विधीसंघर्ष बालक याच्या वारंवार संपर्कात होता. आरोपी उत्तम व विधीसंघर्ष बालक यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून नमुद गुन्हयात चोरी केलेले एकुण १५ तोळे १५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच १० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण ४ लाख ५८ हजार ५६० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी उत्तम ज्ञानेश्वर खंदारे याला ९ मार्चला अटक करुन विधीसंघर्ष बालकास भिवंडीच्या बाल न्याय मंडऴ येथे हजर करण्यात आले आहे.         सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आनंद मोरे, उमेश वरठा, आशपाक जमादार, तडवी, पन्हाळकर, पांडुरंग केंद्रे, छबरीबन, राऊत यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnalasopara-acनालासोपारा