शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात

By अंकुश गुंडावार | Updated: February 19, 2025 20:50 IST

देशी कट्टा, वाघाच्या मिश्या केल्या जप्त

सडक अर्जुनी: वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून वाघ, बिबट्याची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना सडक अर्जुनी येथून ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि.१९) केली. आरोपींमध्ये विठ्ठल मंगरू सराटी (रा. दल्ली हल्दीटोला, सडक अर्जुनी), हरीश लक्ष्मण लांडगे (रा. मुंडीपार, सडक, ता. साकोली, जि. भंडारा), घनश्याम शामराव ब्राह्मणकर (रा. पिपरी राका, ता. सडक अर्जुनी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार विभागीय वन अधिकारी दक्षता पी. जी. कोडापे, नागपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट्या वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी वनपरिक्षेत्रात सापळा रचला. तसेच बनावट ग्राहक तयार करून आरोपींसोबत बोलणी करून त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील परिसरातून बुधवारी ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी येथे आणले. यातील आरोपी विठ्ठल मंगरू सराटी याची अंगझडती घेतली असता त्याच्यावजळ वाघ, बिबट्या यांच्या मिश्या २२ नग, खवले मांजराचे दाेन दात व एक देशी कट्टा पिस्तूल आढळले. तर आरोपी हरीश लांडगे, घनश्याम ब्राह्मणकर यांची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे काही आढळले नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी केली असता तिन्ही आरोपी हे वाघ, बिबट्या वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव विक्री करण्याचे व्यवसाय करीत असल्याचे उघडकीस आले.

...........................आरोपींना १९ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी

ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३५ ,३९, ४४, ४८, (ए) ४९, बी ५०, ५१ गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही आरोपींना बुधवारी (दि.१९) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी सुनावली आहे................

यांनी केली कारवाईवन विभागीय वन अधिकारी नागपूर पी. जी. कोडापे, नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पवन जेफ, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक रवी भगत, छबुकांता भडांगे यांनी केली.

...................शिकाऱ्यांची टोळी सक्रिय

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात लगत असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व वनविभागाच्या सडक अर्जुनी परिसरात घनदाट जंगल असल्याने वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची तस्करी करणारेसुद्धा या परिसरात सक्रिय असल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्याPoliceपोलिसforestजंगलArrestअटक