शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

आर्थर रोडमधील पाच कैद्यांनी केला केमिस्ट हत्येतील आरोपीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 08:02 IST

पाेलिसांकडून गुन्हा दाखल, जखमी आराेपीवर उपचार सुरु

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे अमरावतीचे केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्या कटात सहभागी असलेल्या आरोपीला आर्थर रोडमधील पाच कैद्यांनी मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. शाहरुख पठाण, असे  आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी पाच कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

आर्थर रोड कारागृहात शाहरुख पठाण  व इतर कैद्यांमध्ये  कोणाला कोणत्या कारणावरून अटक झाली यावर चर्चा झाली. उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी शाहरुख पठाणला अटक झाल्याचे समजताच आरोपी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण चव्हाण ऊर्फ आवन व संदीप जाधव यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. यामध्ये  पठाणच्या हाताला व गळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यावर कारागृह रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारागृह प्रशासनाने पठाणवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कारागृह अधिकारी अमोल चौरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारागृहाची शांतता भंग करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

कारागृहातून अन्यत्र हलविण्याची आरोपींची विनंती शाहरुख पठाणला झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींनी आपल्याला आर्थर रोड कारागृहातून अन्य कारागृहात हलविण्याची विनंती विशेष एनआयए न्यायालयाला केली. घटनेचा अहवाल कारागृह प्रशासनाने न्यायालयात सादर केला, तसेच जिवाला धोका असल्याने आरोपींनी अन्य कारागृहात हलविण्याची विनंती केल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयाला सांगितले.

सुनावणी तहकूब आर्थर रोड कारागृहाला आरोपींची विनंती मान्य आहे आणि एनआयएलाही काही हरकत नाही, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.  त्यावर न्यायालयाने आरोपींना अन्य कोणत्या कारागृहात हलविण्यात येऊ शकते, यासंदर्भात अन्य कारागृह अधिकाऱ्यांकडून उत्तर मागत सुनावणी तहकूब केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArthur Road Jailआर्थररोड कारागृह