शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची गळा चिरून हत्या; आरोपी धड घेऊन फरार, माथेरानमधील घटना, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 16:31 IST

महिलेचे मुंडके हत्या करणाऱ्याने कापून नेले असल्याने परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

- मुकुंद रांजाणे

माथेरान: माथेरानमधील इंदिरा नगर परिसरामध्ये एका महिला पर्यटकांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ह्या महिलेचे मुंडके हत्या करणाऱ्याने कापून नेले असल्याने परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

माथेरानमधील इंदिरा नगर परिसरामध्ये अनेक लॉजिंग व्यवसाय करीत असतात अशाच एका ठिकाणी ही घटना घडली असून शनिवारी या ठिकाणी एक जोडपे राहण्यासाठी आले होते. नेहमी प्रमाणे लॉजिंग मालकाने त्यांची नावे रजिस्टरमध्ये लिहून त्यांना खोली भाड्याने दिली होती व सकाळी जेव्हा या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड कॉटखाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले आणि शीर गायब होते.

सदर महिलेस अतिशय निर्घृणपणे मारण्यात आले असून खुन्याने कोणताही पुरावा मागे राहणार नाही, ह्याची पुरेपर खबरदारी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून धडापासून शीर वेगळे करून सदर धड निर्वस्त्र अवस्थेत खुनी तिथेच सोडून गेला आहे तर महिलेचे शीर व कपडेसोबत घेऊन जाताना सदर खोलीतील रक्त ही पुसले असल्याचे दिसून येत होते. ही घटना समोर आल्यानंतर दोघांचेही ओळखपत्र तपासले असता रूम घेताना दिलेली माहिती खोटी असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे दोघांचीही नावे  व पत्ता खोटा असल्याचा संशय घेण्यात येत आहे.

मागील काही दिवसांमध्ये माथेरान मध्ये अल्पवयीन मुलांचा वावर वाढला असून आशा लोकांना सावज करून माथेरान बाहेरील अनेक जण दलाली करून त्यांना खोल्या उपलब्द करून देत आहेत. तर नेरळ येथे ही अल्पवयीन व पर्यटकांना खोटी माहिती पुरवून माथेरानमध्ये तिथूनच रूम्स विकण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा लोकांमुळे माथेरानमध्ये अनधिकृत लॉजिंग व्यवसायाचे पेव वाढत चालले असून काहीजण तर ओळ्खपत्राची छाननी ही बरोबर करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा माथेरान विरोधी लोकांना रोखल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे

टॅग्स :Deathमृत्यूMatheranमाथेरानPoliceपोलिस