शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वच्छतागृहाच्या लाइटमुळे आरोपी सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:21 IST

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खुनाचा आरोप असलेला एक आरोपी घरात अंधार करून स्वच्छतागृहात दडून बसला. मात्र स्वच्छतागृहात असलेल्या उजेडावरून पोलिसांना संशय आला आणि सोमवारी त्यांनी आत शिरत त्याच्या मुसक्या आवळल्या.

- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई : पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खुनाचा आरोप असलेला एक आरोपी घरात अंधार करून स्वच्छतागृहात दडून बसला. मात्र स्वच्छतागृहात असलेल्या उजेडावरून पोलिसांना संशय आला आणि सोमवारी त्यांनी आत शिरत त्याच्या मुसक्या आवळल्या. कुरार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.गुजरातमध्ये २०१२ साली एस. चौधरी नामक व्यापाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी गुलाम हुसेन उर्फ वसीम कदु खान (४८) याला अटक केली होती. तेव्हापासून तो अनेकदा पॅरोलवर बाहेर आला होता. २७ डिसेंबर २०१५ रोजी त्याला १५ दिवसांची पॅरोल मंजूर झाली. त्यानंतर साडेतीन वर्षे तो पसार होता. चौकशीदरम्यान तो मुंबईत मालाडमध्ये लपल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. त्यांनी मुंबई पोलिसांची मदत मागितल.खान पठाणवाडीमध्ये लपल्याची माहिती परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार यांना मिळाली. राठोड आणि कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे आणि पथकाने गुजरात पोलिसांसह पठाणवाडीत सोमवारी पहाटे सापळा रचला. घरात काळोख होता. पथक माघारी परतणार तोच घरातील स्वच्छतागृहात उजेड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात कोणीच नसताना स्वच्छतागृहात लाइट कसा, असा प्रश्न त्यांना पडला आणि तपासून पाहिले असता हातात सुटकेस, नवीन कपडे घालून पसार होण्याच्या तयारीत असलेला खान त्यांना दिसला. कुरार पोलिसांनी त्याला अटक करून गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी