शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, तुर्भेतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 21:23 IST

Coronavirus : अवैधरित्या व्यवसाय सुरु ठेवल्याने केलेली कारवाई

ठळक मुद्देत्याच्या संपर्कात आलेल्या चौघा पोलिसांनचीही चाचणी करण्यात आली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.शहरात लॉकडाऊन असतानाही दुकान खुले ठेवून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचा व्यवसाय तुर्भे सेक्टर 21 येथे सुरु होता.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्याला सीबीडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या चौघा पोलिसांनचीही चाचणी करण्यात आली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.शहरात लॉकडाऊन असतानाही दुकान खुले ठेवून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचा व्यवसाय तुर्भे सेक्टर 21 येथे सुरु होता. 5 मे रोजी एपीएमसी पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला होता. यावेळी अवैधरित्या व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या दांपत्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली. यावेळी त्यांच्या दोन लहान मुलांच्या संगोपनासाठी वडिलाला पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया करून सवलत देण्यात आली होती. यांनतर 11 मे रोजी त्याला अटक केल्यानंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.  त्याचा अहवाल प्राप्त झाला असता, त्याला कोरोनाची लागण झालेली असल्याचे समोर आले. यामुळे त्याला सीबीडी येतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर कोरोना पॉजिटीव्ह असल्याने त्याला जामीन द्यावा यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे शिफारस केली असता न्यायालयाने  फेटाळली. यामुळे त्याच्यावर कोविड सेंटरमध्ये पाळत ठेवण्यासाठी देखील पोलीस बंदोबस्त पुरवावा लागणार आहे. 

भांडणाच्या रागातून पतीवर पत्नीने ओतले उकळलेलं पाणी 

 

दुर्दैवी! शेतातून घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली, १३ जणांचा मृत्यू 

 

Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू

 

यादरम्यान चौकशी निमित्ताने तसेच न्यायालयात घेऊन जाण्या येण्याच्या प्रक्रियेत चार पोलीस त्याच्या सतत संपर्कात होते. त्यांची देखील चाचणी करण्यात आली असून तूर्तास त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे नवी मुंबई पोलिसांमध्ये भीती पसरली आहे. एखाद्या गुन्ह्यातील आरोपी पकडताना त्याच्याशी संपर्क येत असल्याने चाचणीनंतर तो पॉजिटीव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांसह पोलिसांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाचा धोका सतावत आहे. शिवाय एपीएमसी मार्केट आवारातच सर्वाधिक कोरोना पॉजिटीव्ह व्यक्ती आढळून येत आहेत. त्यामुळे अज्ञात व्यक्तींसोबत सुरक्षित अंतर ठेवूनच कामकाज करावे लागत आहे. अशातच पकडलेला आरोपी पॉजिटीव्ह आढळून आल्याने गुन्हेगारांवर कारवाई करतानाही पोलिसांवर कोरोनाची टांगती तलवार निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई