शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सरकारी वाहनातून आरोपी पळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 11:52 PM

आरोपीला घेऊन गोखले हायस्कूल, खारघर येथे जात असताना सरकारी वाहनातून पळ काढून आरोपी पसार झाला आहे. अरमान मुक्तार मोहम्मद (वय १९, रा. भांडुप पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे.

नवीन पनवेल : आरोपीला घेऊन गोखले हायस्कूल, खारघर येथे जात असताना सरकारी वाहनातून पळ काढून आरोपी पसार झाला आहे. अरमान मुक्तार मोहम्मद (वय १९, रा. भांडुप पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे.रिमांडकामी पोलीस हवालदार भास्कर माळवे हे चार आरोपींना घेऊन मुलुंड न्यायालय येथे रवाना झाले. या आरोपींना न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांना पोलीस तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे घेऊन गेले. आरोपी अरमान मुक्तार मोहम्मद याचे नाव मेडिकल पेपर आणि कोविड रिपोर्टवर चुकले असल्याने त्याला घेऊन पोलीस सरकारी वाहनात थांबले होते. इतर तीन आरोपींना गोखले हायस्कूल, खारघर कारागृहात जमा करीत असताना अरमानने चलाखीने हातातील बेडीमधून हात काढून घेतला. या वेळी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने माळवे यांच्या छातीवर लाथ मारली आणि गाडीच्या बंद दरवाजाच्या उघड्या काचेच्या खिडकीतून बाहेर उडी मारून तो पळून गेला. त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी