शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणातील आरोपी मोटार सोडून पळाल्याने सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 17:29 IST

आरोपी ज्या मोटारीतून ते आले होते ती मोटार तेथूच सोडून गेले असल्याने पोलिसांनी या मोटारीबद्दलची माहिती मिळविली.

ठळक मुद्देवाकड पोलिसांच्या हद्दीत शनिवारी रात्री व्यवसायिकावर गोळीबारबनावट फेसबुक अकाऊटंचा वापर 

पिंपरी : वाकड पोलिसांच्या हद्दीत शनिवारी रात्री व्यवसायिकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत. गोळीबार करून आरोपी मुंबई- बंगळुरू महामार्ग ओलांडून पळून गेले. आरोपी ज्या मोटारीतून ते आले होते ती मोटार तिथेच सोडून गेले असल्याने पोलिसांनी या मोटारीबद्दलची माहिती मिळविली. त्या आधारे आरोपींचा शोध घेणे शक्य झाले. मुळशीतील गुन्हेगारी टोळीतील आरोपींचा या गोळीबार प्रकरणात सहभाग असल्याचे प्राथमिक पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण ज्ञानदेव काळे (कोथरूड), अभिलाष दत्तात्रय मोहोळ (शिवणे), रोहित प्रदीप देवळे, अक्षय भिमराव गोडंबे या आरोपींना अटक केली आहे तर उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत. शनिवारी रात्री साडेआकराच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या मागावर आले होते. हरिओम मेहरसिंग सिंग (वय ३०) हे फिर्यादी मुंबई- बंगळुरू महामार्गालगत वाकड हद्दीत सिगारेट घेण्यासाठी पान टपरीवर थांबले असता, आरोपी त्यांच्या मोटारीत बसले. फिर्यादी मोटारीत आले. त्यावेळी आरोपींनी त्यांना पिस्तुल दाखविले. फिर्यादी मोटारीतून बाहेर पडून आरडा ओरडा करत पळू लागले. त्यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडली. फिर्यादी सिंग यांच्या मांडीतून गोळी आरपार गेली. ते जखमी झाले. आरडा ओरडा करताख नागरिक जमा झाल्याने हल्लेखोर त्यांनी आणलेली मोटार तेथेच सोडून पळुन गेले. पोलिसांनी या घटनेच्या तपासात घटनास्थळाजवळ उभ्या असलेल्या मोटारीबद्दल माहिती मिळवली. त्यावेळी आरोपींची माहिती पोलिसांच्या हाती लागली. दोन दिवसात पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेतला. ......................बनावट फेसबुक अकाऊटंचा वापर हल्लेखोरांनी बनावट फेसबुक अकाऊंट उघडून फिर्यादीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दक्षिणेतील अभिनेत्रीच्या छायाचित्राचा डीपी लावुन ते फिर्यादीच्या संपर्कात होते. शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश मिळवुन देण्याचे, परदेशात अभ्यासक्रमास प्रवेश मिळवुन देण्याचे काम करीत असल्याची माहिती आरोपींनी मिळवली. त्याच्याकडून मोठी रक्कम उकळता येईल, या दृष्टीने त्यांनी योजना आखली. फिर्यादी काही दिवस परगागवी गेले असल्याने आरोपींनी ते परत येण्यापर्यंत प्रतिक्षा केली. फेसबुकच्या माध्यमातून ते फिर्यादीच्या संपर्कात होते. फिर्यादी परगावहून येताच आरोपी त्यांच्या मागावर राहिले. शनिवारी त्यांनी फिर्यादीला धमकावुन लुटण्याचा प्रयत्न केला. फेसबुकच्या माध्यमातून आरोपींनी सावज शोधल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी गोळीबार प्रकरणी पोलीस पथकाने केलेल्या तपासाची माहिती दिली. तपास पथकातील पोलिसांचे कौतुक केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस