शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींनी सीबीआयची कागदपत्रे नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 05:42 IST

Narendra Dabholkar murder case: पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, ही कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी देण्यास मुदत देण्याची मागणी ‘सीबीआय’च्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली.

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात सादर केलेली पुराव्यांशी संबंधित १३ महत्त्वाची कागदपत्रे आरोपीच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात नाकारली.   त्यामुळे ‘सीबीआय’च्या विशेष सरकारी वकिलांना साक्षीदारांची यादी सादर करून ही कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत. पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चिती झाली असून, आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले. त्यामुळे ‘सीबीआय’ने गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २९४ नुसार, पुराव्यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. 

कागदपत्रात घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनापूर्वीचा पंचनामा, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपीच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो अशा १३ कागदपत्रांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे बचाव पक्षाच्या वकील ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी नाकारली.

साक्षीदारांची यादी देण्यास मुदतवाढही कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी देण्यास मुदत देण्याची मागणी ‘सीबीआय’च्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. तत्पूर्वी, मागील सुनावणीवेळी बचाव पक्षाने केलेल्या मागणीनुसार, या प्रकरणाची केस डायरी सीलबंद स्वरूपात न्यायालयात सादर करण्यात आली.

या प्रकरणात ‘सीबीआय’तर्फे न्यायालयात सादर केलेली सर्व कागदपत्रे बचाव पक्षाने नाकारली आहेत. त्यामुळे आता पुढील सुनावणीला साक्षीदारांची यादी दिली जाईल. त्यानंतर साक्षीदार तपासून ही कागदपत्रे सिद्ध करण्यात येतील. - ॲड. प्रकाश सूर्यवंशी, विशेष सरकारी वकील

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCBIगुन्हा अन्वेषण विभाग