मॅट्रिमाेनी साइटवरून गंडा घालणारा आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:04 IST2020-12-26T00:04:02+5:302020-12-26T00:04:19+5:30

crime news : विकास मनोहर पाटील असे आराेपीचे नाव आहे. जानेवारीमध्ये हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला हाेता.

Accused arrested for wearing gang from matrimonial site | मॅट्रिमाेनी साइटवरून गंडा घालणारा आरोपी अटकेत

मॅट्रिमाेनी साइटवरून गंडा घालणारा आरोपी अटकेत

नालासोपारा : वसईच्या स्टेला परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीशी सोशल मीडियावरील मॅट्रिमोनी साइटवर ओळख करून लग्नाच्या भूलथापा देऊन लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आराेपीला पाेलिसांनी पुण्यातून अटक केली. विकास मनोहर पाटील असे आराेपीचे नाव आहे. जानेवारीमध्ये हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला हाेता.
वसई पश्चिमेकडील स्टेला परिसरातील अरुणोदय सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणीची मे २०१७ ते जानेवारी २०२० दरम्यान मॅट्रिमाेनी साइटवर पुणे येथे राहणाऱ्या आराेपी विकास यांच्यासाेबत ओळख झाली. त्यानंतर विकास याने पीडित तरुणीला लग्नाचे प्रलाेभन दाखवून तिच्या नावावर बँकेचे लोन मंजूर करून सहा लाखांची तिची कार चालविण्यासाठी घेतली. तसेच ही कार परत न करता एचडीएफसी बँकेच्या धनादेशाद्वारे एक लाख ४६ हजार रुपये, तर खात्यातून वेळोवेळी दाेन लाख ९३ हजार रुपये हस्तांतर केले. दाेन लाख एसव्हीसी बँकेच्या एटीएमद्वारे, ८७ हजार रुपये रोख रक्कम, ५५ हजारांची ऑनलाइन ट्रान्झॅक्शन अशा एकूण १३ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी तरुणीने केलेल्या तक्रारीवरून माणिकपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविला हाेता. त्यानंतर आरोपी सतत राहण्याचे ठिकाण बदलत हाेता. अखेर गुप्त माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांच्या पथकाने आरोपीला पुण्यातून अटक केली. त्याच्याकडे पीडित तरुणीची एटीएम कार्ड सापडले आहेत. वसई न्यायालयाने आराेपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.

आरोपी सतत राहण्याचे ठिकाण बदलत हाेता. अखेर माणिकपूर पोलिसांच्या पथकाने आरोपीला पुण्यातून अटक केली.

Web Title: Accused arrested for wearing gang from matrimonial site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक