शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोटरमनने दाखवले प्रसंगावधान, लोकल थांबवल्यानं आत्महत्या करणाऱ्याचा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 16:12 IST

Accident Attempt : अंबरनाथ स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी घडली घटना

ठळक मुद्दे मोटरमनने प्रसंगावधान राखत वेळीच लोकल थांबवल्यानं या इसमाचा जीव वाचला.या इसमाचं वय अंदाजे ५० वर्ष असून त्याने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला? याचा तपास सध्या रेल्वे पोलीस करतायत.

अंबरनाथ : अंबरनाथमध्येरेल्वे रुळांवर झोपून एका इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मोटरमनने प्रसंगावधान राखत वेळीच लोकल थांबवल्यानं या इसमाचा जीव वाचला.             

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळच मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कर्जतहुन मुंबईच्या दिशेनं जाणारी लोकल भरधाव वेगात अंबरनाथ स्थानकात येत असताना अचानक हाल्याचा पाडा परिसरात एक इसम लोकलसमोर रेल्वे रुळांवर झोपल्याचं मोटरमनच्या निदर्शनास आलं. त्यामुळं मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावत या इसमापासून अवघ्या काही फुटांवर लोकल थांबवली. यानंतर काही प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांनी या इसमाला रेल्वे स्थानकात आणलं. या घटनेमुळे काही काळ मोठा गोंधळ उडाला. तसंच लोकलही काही मिनिटं खोळंबली. या इसमाचं वय अंदाजे ५० वर्ष असून त्याने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला? याचा तपास सध्या रेल्वे पोलीस करतायत. 

टॅग्स :railwayरेल्वेSuicideआत्महत्याambernathअंबरनाथPoliceपोलिस