शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या निवडणुकीतील पत्नीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी घडवून आणला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:37 IST

न-हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा बनाव करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - न-हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा बनाव करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश कैलास कांबळे (वय ३९, रा़ विठ्ठल कलावती निवास, न-हे) आणि नितीश सतीश थोपटे (वय ३०, रा़ थोपटे बिल्डिंग, धायरीगाव) अशी त्यांची नावे आहेत़ ही घटना मुंबई -बंगलुरु महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडला ओमकार लॉजजवळ १३ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली होती़ अपघातात बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२, रा़ नºहे) हे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांच्या डोक्याला मार लागला असून हातपायाला गंभीर जखमा झाल्या आहेत़ त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 

पोलिसांनी सांगितले की, बाळासाहेब वनशिव हे न-हे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी वनशिव यांचे पती आहेत़ ते व त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर हे १३ मार्चला सकाळी साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते़ आंबेगाव खुर्द येथील सर्व्हिस रोडने ते जात असताना एक पांढऱ्या रंगाची कार दोन ते तीन वेळा त्यांच्या बाजूने फिरुन गेली होती़ व्यायाम करुन ते परत येत असताना सर्व्हिस रोडच्या कडेने ते जात होते़ तेव्हा मागून आलेल्या कारने वनशिव यांना जोरात धडक दिली व ती कार वेगाने निघून गेली़ टिळेकर व वनशिव यांच्या नातेवाईकांनी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले़ सरपंच मिनाक्षी वनशिव यांनी अविनाश कांबळे यांच्यावर संशय व्यक्त केला होता़ या गुन्ह्णाचा तपास करीत असताना सहायक फौजदार प्रदीप गुरव व पोलीस शिपाई जगदीश खेडेकर यांना कांबळे व थोपटे हे दोघे कोळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला़ त्यांचा मित्र रोहीत पवार (रा़ नºहे गाव) याची कार घेऊन गुन्हा केल्याचे सांगितले़ ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, सहायक उपनिरीक्षक प्रदीप गुरव, हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव सकपाळ, जगदीश खेडकर यांनी केली़चिठ्ठीवर झाल्या होत्या विजयीन-हे ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक १५ मार्च २०१८ साली झाली होती़ त्यावेळी सरपंचपदासाठी रेश्मा अविनाश कांबळे, मीनाक्षी बाळासाहेब वनशिव, अनिता देविदास कुटे असे एकूण तीन अर्ज आले मात्र अनिता कुटे यांचा अर्ज अवैध ठरल्याने रेश्मा कांबळे व मीनाक्षी वनशिव यांच्यात सरपंचपदाची लढत होती. गुप्त मतदान पद्धतीत दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ८ -८ अशी समान मते पडली़ त्यामुळे चिठ्ठी पद्धतीने मतदान घेण्यात आले़ त्यात मिनाक्षी वनशिव यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्या सरपंच झाल्या़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी