शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Accident: गोवा फिरून जात असलेल्या पर्यटकांच्या बसला भीषण अपघात, ९ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 21:11 IST

Accident in Gulbarga: गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा येथे झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली.

गुलबर्गा - गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा येथे झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, हैदराबादचे रहिवासी असलेले प्रवासी स्थानिक ऑरेंज या संस्थेच्या खाजगी बसने गेल्या दोन दिवसापूर्वी गोव्याच्या पर्यटनासाठी गेले होते. गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आज शुक्रवारी ते हैदराबादकडे निघाले होते. यावेळी गुलबर्गा शहराच्या बाहेरील सोलापूर -हैदराबाद राज्य महामार्गावर कमलापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरला बसने जोराची धडक दिली. या अपघातात बसने पेट घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली.

बसमधून एकूण २९ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने २० प्रवासी गंभीर जखमी झाले तर उर्वरित नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. जखमींना गुलबर्गा शहरातील सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बसची आग आटोक्यात आणली. या भीषण अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा