शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकच्या काळात लाचखोरीला वेग, २१७ जण जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 03:19 IST

जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लाचखोरीला लागलेला ब्रेक अनलॉकच्या काळात फेल झाल्याने लाचखोरीने पुन्हा वेग घेतला आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेली कारवाई (एसीबी) एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत चार पटीने वाढली आहे.जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली.मे महिन्यात ३० कारवायांत ४३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. १ जूनपासून देशात अनलॉकचा टप्पा सुरू झाला आणि लाचखोरीलाही वेग आला. जूनमध्ये कारवाईचा आकडा ६४ वर गेला. तर जुलैमध्ये ५६ तर आॅगस्टमध्ये ४३ वर गेला. या तीन महिन्यांच्या कारवाईत २१७ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कारवाई ४७ ने कमी आहे.येथे करा तक्रारलाच स्वीकारणे जसा गुन्हा आहे, तसा देणेदेखील गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही लाच मागत असेल, त्याबाबत एसीबीच्या १०६४ या हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक