शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांवर एसीबीने लाच घेताना केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 21:39 IST

वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवसई विरार महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समितीच्या एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहात सोमवारी दुपारी पकडले आहे. नवजीवन येथील राहते घराच्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 30 वर्षीय पीडित तक्रादाराकडून कारवाई करू नये म्हणून योगेश आणि गोरख यांनी 25 हजारांची लाचेची मागणी केली होती

नालासोपारा - ठाणे येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून वसई विरार महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समितीच्या एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहात सोमवारी दुपारी पकडले आहे. या घटनेने संपूर्ण महानगरपालिकेच्या विभागांमध्ये खळबळ माजली आहे. वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समिती कार्यालयात योगेश रविकांत सावंत (49) हे अतिक्रमण विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असून गोरख सदगीर (29) आणि नारायण अंकुश देसाई (28) हे ठेका कर्मचारी त्यांच्यासोबत जोडीला काम करत होते. नवजीवन येथील राहते घराच्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 30 वर्षीय पीडित तक्रादाराकडून कारवाई करू नये म्हणून योगेश आणि गोरख यांनी 25 हजारांची लाचेची मागणी केली होती. पण तडजोडी अंती 15 हजार रुपयांवर मान्य झाले होते. सोमवारी सकाळी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी वालीव प्रभागातील नवजीवन येथील बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी दोघांच्या वतीने नारायण याला 15 हजार रुपये रोख रक्कम स्विकारताना सोमवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकारी  पोलीस उपअधीक्षक कुळकर्णी, कर्मचारी पोलीस नाईक गोसावी,  पोलिस नाईक पवार, महिला पोलिस नाईक जोंधळे, पोलिस शिपाई पवार, पोलीस शिपाई त्रिभुवन या पथकाने सापळा रचून पकडले आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागVasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका