शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

मुंबईत 'क्लास वन' अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोटयवधीचे घबाड; ACB ची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 23:50 IST

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकलेले वांद्रे येथील शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सह संचालक अनिल मदनजी जाधव (५२) यांच्या घरातून कोटयवधीचे घबाड मिळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकलेले वांद्रे येथील शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सह संचालक अनिल मदनजी जाधव (५२) यांच्या घरातून कोटयवधीचे घबाड मिळून आले आहे. त्यांच्या घर, कार्यालयातून १ कोटी ६१ लाख ३८ हजार किंमतीचे ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ८१ लाखांची रोख रककमेचा समावेश आहे. 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टेंडर स्किन इंंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अँँकॅडमी मध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अँँकॅडमी व त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सच्या मंजुरी करता जाधव यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून २०२१ मध्ये पूर्व मंजुरी प्राप्त झाली. याप्रकरणात अंतिम मंजुरी करता जाधव याने पाच लाखांची मागणी केली. मंगळवाऱी पाच लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून एसीबी अधिक तपास करत आहेत.

एसीबीने त्यांच्या घर, कार्यालयात  सर्च ऑपरेशन केले आहे. यामध्ये घरात एक किलो ५७२ ग्रँम सोने, आणि ७९ लाख ४६ हजार रूपयांची रोकड़ मिळून आली आहे. तर कार्यालयातून २ लाख २८ हजार रूपयांची रोकड़ जप्त करण्यात आली आहे. दागिने, आणि रोकड़ जप्त करत  अधिक तपास करत असल्याचे एसीबीने सांगितले आहे. तसेच त्यांच्या अन्य मालमत्तेबाबतही अधिक चौकशी सुरु आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी