शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीची कारवाई! तलाठ्याला प्रलोभन देणारे बिल्डर, ब्रोकर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 21:10 IST

ACB trap :  १० हजारांच्या लाचेची तजवीज

ठळक मुद्दे एसीबीने सापळा रचून दोघांनाही शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे तलाठ्याचे कौतुक होत आहेत.

अमरावती : पडीक शेतीचे काम करून देण्याकरिता तलाठ्याकडे आलेल्या एका बिल्डरसह इस्टेट ब्रोकरने १० हजारांच्या लाचेचे प्रलोभन दाखविले. त्याला बळी न पडता तलाठ्यानेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हवाली केले. ही कारवाई अमरावती येथे बियाणी चौकात राहुल पान सेंटरसमोर शुक्रवारी दुपारी करण्यात आली.  एमडीएम बिल्डर अँड डेव्हलपर्स प्रा.लि.चा संचालक शंकरलाल महेशकुमार आहुजा (३३, रा. आहुजा फ्लोअर मिलजवळ, रामपुरी कॅम्प) आणि शेती व प्लॉट ब्रोकर विजय बाबाराव चव्हाण (५०, रा. संगीतानगर, सोनल कॉलनी) अशी अमरावती येथील आरोपींची नावे आहेत. तलाठी संतोषसिंग गिल (५१, रा. अमरावती) यानी एसीबीकडे तक्रार नोंदविली. ते तिवसा तालुक्यातील वऱ्हा सांझा क्रमांक २१ चा कारभार सांभाळतात, शिवाय सालोरा बु. सांझा क्रमांक ३ येथील अतिरिक्त प्रभार आहे.

आरोपी शंकरलाल आहुजा व त्याच्या कुटंबीयांच्या नावावर असलेल्या मौजा सालोरा बु. येथील पडीक शेतजमिनीच्या सात-बारामधील गाव नमुना १२ मध्ये सन २०२०-२०२१ मध्ये कापूस या पिकाची नोंद करून बेकायदेशीर कृत्य करण्याकरिता २२ आॅक्टोबर रोजी सांझा कार्यालय वऱ्हा येथे पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष आरोपी आहुजा याने तक्रारदार तलाठी यांना १० हजार रुपयांच्या लाचेचे प्रलोभन दिले. त्यास आरोपी चव्हाण यानेसुद्धा लाचेचे प्रलोभन देऊन आरोपी आहुजा याला सहकार्य केले. त्यावर एसीबीने सापळा रचून दोघांनाही शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे तलाठ्याचे कौतुक होत आहेत.

 एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल तसरे, नायब पोलीस शिपाई विनोेद कुंजाम, वैभव जायले, सुनील जायेभोये, चालक सतीश किटुकले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAmravatiअमरावतीPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण