शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार पत्नीवर झाला, आत्महत्या पतीने केली; संभाषण व्हायरल झाल्याने दु:खीकष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:28 IST

महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीस रेकॉर्डिंग पाठविणाऱ्या पाच जणांविरुद्ध रविवारी रात्रीच्या सुमारास पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भोकरदन : पत्नीवर झालेला अत्याचार आणि आरोपींनी पाठविलेले संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकून बदनामीच्या भीतीने पीडितेच्या पतीने विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना ५ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव रेणुकाई (ता. भोकरदन, जि. जालना) येथे घडली. महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीस रेकॉर्डिंग पाठविणाऱ्या पाच जणांविरुद्ध रविवारी रात्रीच्या सुमारास पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गजानन देशमुख, रवी सपकाळ, गजानन शिरसाठ (सर्व रा. पिंपळगाव रेणुकाई) व इतर दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तक्रारीत म्हटले की, रवी सपकाळ याच्याशी फोनवर बोलण्यास भाग पाडले. तसेच गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करून त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. शिवाय तिच्यावर अत्याचार करण्यात आला. संशयित आरोपींनी महिलेशी झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप पीडितेच्या पतीला पाठविल्या. त्या  ऐकल्यानंतर बदनामी झाल्याचा समज करून पीडितेच्या पतीने ५ नोव्हेंबर रोजी विष पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी संशयित पाच जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार