शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणावर तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया; नारळ बाहेर काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 23:00 IST

डॉक्टरांची देखील कसोटी लागली होती पणाला

ठळक मुद्दे हे भीषण कृत्य करणारे आरोपी अद्यापही मोकाटच असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सागर विहार परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नारळाला लावलेले सात निरोध व कुजलेला कपडा देखील त्याच्या गुदमार्गातून काढल्याचे त्यांनी सांगितले.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - वाशीत ३४ वर्षीय तरुणावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात त्याला नारळावर बसवून वरून दाब देऊन पार्श्वभागात नारळ घुसवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे सुमारे १२ सेंटीमीटर आतमध्ये गुदमार्गात अडकलेला नारळ बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना साडेतीन तासाची शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, हे भीषण कृत्य करणारे आरोपी अद्यापही मोकाटच असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सागर विहार परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यावेळी पाच पैकी तीन जणांनी त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्यांनी घटनास्थळीच पडलेल्या कुजलेल्या नारळाला निरोधचे सात थर लावून तो पीडित तरुणाच्या पार्श्वभागात घुसवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आत न गेल्याने पीडित तरुणाला नारळावर बसवून पाचही जणांनी त्याच्यावर वरून दबाव टाकून तो आत घुसवल्याची धक्कादायक माहिती पीडिताने पोलिसांना दिली आहे. मात्र यावेळी झालेल्या रक्तस्त्रावामुळे तो बेशुद्ध पडला असता तो मृत पावल्याचे समजून पाचही गर्दुल्यांनी तिथून पळ काढला. काही वेळानंतर पिडीत तरुण शुद्धीवर आला असता त्याने, मदतीसाठी आवाज दिला. परंतु तिथे कोणीच नसल्याने बळ एकवटून तो झाडीतून बाहेर आला व दुचाकीवरून स्वतःच रुग्णालय गाठले. यावेळी त्याच्या गुदमार्गातल्या नारळचे आतले टोक सुमारे १२ सेमी आत असून त्यापासून आतड्यांना दुखापत झाल्याचे आढळून आले. तर शेवटचे टोक ४ शरीराच्या वरच्या भागापासून आतमध्ये असल्याने तो नारळ काढायचा कसा असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता.गुदमार्गात नारळ घुसल्याची जागतीक स्तरावरील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी २०० हून अधिक तज्ञांचे सल्ले घेण्यात आले. त्यानंतर नारळाला ड्रिल मशीनने छेद पाडून शरीरातच त्याचे तुकडे करून तो बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सुमारे तीन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर नारळ पूर्णपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. डॉक्टर प्रकाश शेंडगे, डॉक्टर किशोर नाईक व इतर ८ जणांच्या पथकाने हि शस्त्रक्रिया केली. त्याकरिता शस्त्रक्रियेपूर्वी एका नारळावर सराव देखील करण्यात आल्याचे डॉक्टर शेंडगे यांनी लोकमतला सांगितले. यावेळी नारळाला लावलेले सात निरोध व कुजलेला कपडा देखील त्याच्या गुदमार्गातून काढल्याचे त्यांनी सांगितले.तरुण मानसिक धक्क्यातसामूहिक बलात्कार व त्यांनतर घडलेल्या कृत्यामुळे पीडित तरुणाला मानसिक धक्का बसला आहे. याचा परिणाम प्रकृतीवर होऊ नये याकिरता त्याच्यावर मानसोपचार तज्ञामार्फत देखील उपचार सुरु आहेत. तर त्याला धक्क्यातून सावरण्यासाठी बळ देण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

जगातली पहिली घटनागुदमार्गात नारळ घुसवल्याची अथवा तो काढल्याची जगातली हि पहिलीच घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या शास्त्रक्रिये बाबत कोणत्याच तज्ञाकडे आवश्यक माहिती नव्हती. अखेर शस्त्रक्रियेपुर्वी दिड तासात २०० हून अधिक तज्ञाचे सल्ले घेऊन, आवश्यक सराव करून हि शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. - डॉ. प्रकाश शेंडगे - सर्जन 

 

आरोपी अद्याप मोकाटचतरुणावर सामूहिक लैंगिक अत्याचार करणारे पाचही आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र ते अद्याप मोकाटच असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारhospitalहॉस्पिटलNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसdoctorडॉक्टर