फायरिंगसाठी मॉरिसनं घेतलं यूट्युबवरून प्रशिक्षण; डिसेंबरमध्येच शिजवला हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 06:38 AM2024-02-14T06:38:34+5:302024-02-14T06:50:30+5:30

मिश्रा डिसेंबरमध्ये नोकरीवर रुजू झाला. त्याला ४० हजार पगार देत होते.  

Abhisheh Ghosalkar Murder: mauris noronha took training on YouTube for firing; The murder plot was hatched in December itself | फायरिंगसाठी मॉरिसनं घेतलं यूट्युबवरून प्रशिक्षण; डिसेंबरमध्येच शिजवला हत्येचा कट

फायरिंगसाठी मॉरिसनं घेतलं यूट्युबवरून प्रशिक्षण; डिसेंबरमध्येच शिजवला हत्येचा कट

मुंबई : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी हाताळायची यासाठी मॉरिस नरोन्हाने यूट्युबवर सर्च केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. व्हिडीओ पाहून प्रशिक्षण घेत गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. साडी वाटपाच्या कार्यक्रमाला बोलावून नरोन्हाने घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी नरोन्हाने बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राच्या बंदुकीचा वापर केल्याने पोलिसांनी मिश्राला बेड्या ठोकल्या आहेत. 

दुसरीकडे बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार, मिश्राला कामाची आवश्यकता होती. दोन महिन्यांपूर्वी नरोन्हाकडून कामाची ऑफर दिली. मात्र, कामावर ठेवण्यापूर्वी शस्त्र ऑफिसमध्ये ठेवून जाण्याची अट घातली होती. त्यानुसार मिश्रा डिसेंबरमध्ये नोकरीवर रुजू झाला. त्याला ४० हजार पगार देत होते.  एकूणच मॉरिसने डिसेंबरमध्येच हत्येचा कट शिजवल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मिश्रा १३ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत होता. मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

अमरेंद्रला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या अमरेंद्र मिश्रा याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या हत्येच्या कटातून अमरेंद्रला काही फायदा झाला का? याची चौकशी करायची असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी दंडाधिकाऱ्यांना केली. त्यांच्या या मागणीला मिश्राच्या वकिलांनी विरोध केला. मिश्राने आतापर्यंत पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांना हवी ती माहिती दिली आहे. त्यामुळे त्याला आणखी पोलिस कोठडी सुनावण्यात येऊ नये, असे मिश्राच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: Abhisheh Ghosalkar Murder: mauris noronha took training on YouTube for firing; The murder plot was hatched in December itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.