शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील बालिकेचे ठाणे रेल्वे स्थानकातून अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 06:27 IST

आपल्या आईसमवेत जालन्यातून ठाण्यात आलेल्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना ठाणे रेल्वे स्थानकात गुरुवारी घडली.

ठाणे : आपल्या आईसमवेत जालन्यातून ठाण्यात आलेल्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना ठाणे रेल्वे स्थानकात गुरुवारी घडली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.जालना जिल्ह्यातील कुंभार-पिंपळगाव येथे राहणारी ३५ वर्षीय यमुना रोहित नरवडे हिचा नवरा काहीच कामकाज करत नाही. त्यामुळे रोजीरोटी कमविण्यासाठी तिने २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस पकडली. २५ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता ती ठाण्यात उतरली. या वेळी तिच्यासोबत पाच वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षीय मुलगी होती. ठाण्यात आल्यानंतर ती दिवसभर रेल्वे स्थानकातच बसून होती. रात्री जेवण केल्यानंतर दोन मुलांना घेऊन ती फलाट क्रमांक दहाबाहेर झोपी गेली.उत्तररात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्यांना पोलिसांनी उठवून, येथे झोपू नका, असे सांगितले. परंतु त्यांच्याकडे दुसरीकडे निवारा नसल्याने पोलीस गेल्यावर ती पुन्हा मुलांना घेऊन झोपी गेली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिला जाग आली, तेव्हा मुलगी तेथे नसल्याचे उघड झाले. त्यानुसार तिने कोपरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी