शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

सीसीटीव्ही फुटेजचा आधार अन् पोलिस हरयाणात!

By नितिन गव्हाळे | Updated: January 18, 2023 18:02 IST

पोलिसांनी युसूफ खान आस मोहम्मद (३५) याला अटक केली. 

अकोला : केशव नगरातील रिंगरोडवरील एसबीआयचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील १६ लाख ५४ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना ५ जानेवारी रोजी पहाटे घडली होती. त्यासाठी चोरट्यांनी महागड्या क्रेटा कारचा वापर केला. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी चौकाचौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेऊन कारचा माग काढला. सायबर पोलिसांचीही मदत घेतली. एटीएम फोडणारी ही टोळी हरयाणाची असल्याचे समोर आले. पोलिस हरयाणा येथे पोहोचले. त्यांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पोलिसांनी युसूफ खान आस मोहम्मद (३५) याला अटक केली. 

एटीएम फोडून १६ लाख रुपयांची रक्कम पळवित, चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले होते. हे आव्हान पोलिसांनी स्वीकारत, १४ दिवसांमध्ये काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हरयाणा गाठून या चोरीत सहभागी असलेल्या युसूफ खान आस मोहम्मद (३५, रा. पिनागवा, ता. पुन्हाना, जि. नुह, राज्य हरयाणा) याच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, एटीएम फोडण्याच्या कटात सद्दाम माजीद (रा. पडली, जि. नुह), अताउल्ला खान (रा. पडली, जि. नूह), सलीम खान हनीफ खान (रा. पिनागवा) व संजय यादव (रा. रामगड, जि. अलवर, राजस्थान) यांचाही समावेश असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. 

पोलिसांनी आरोपी युसूफ खान याला अटक करून अकोल्यात आणून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या समोर हजर केले. पोलिस अधीक्षकांनीही युसूफची चौकशी केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, एपीआय गोपाल ढोले, पीएसआय गोपाल जाधव, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे, लीलाधर खंडारे, मो. आमिर, मो. अन्सार, सतीश पवार, अक्षय बोबडे व प्रवीण कश्यप यांच्या पथकाने केली.

हजारो किमी प्रवास करून एटीएम फोडलेआरोपी युसूफ खान, सद्दाम माजीद, अताउल्ला खान, सलीम खान हनीफ खान आणि संजय यादव यांनी एकत्र येऊन एटीएम फोडण्याचा कट रचला आणि हजारो किमीचा प्रवास करून ही टोळी अकोल्यात पोहोचली. या टोळीने केशव नगरातील एसबीआयचे एटीएममध्ये शिरून त्यातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि अलार्मसुद्धा तोडून १६ लाखांची रोकड पळविली होती.

...अखेर एटीएम फोडणाऱ्यांची टोळी गवसली!स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी याप्रकरणाचा युद्धपातळीवर तपास करून १४ दिवसांतच टोळीचा छडा लावत, हरयाणातून टोळीतील एका सदस्याला अटक करण्यात यश मिळविले. टोळीतील उर्वरित चार आरोपींना लवकरच गजाआड करू, असा विश्वास पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला