शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वाळू उपसा केल्याच्या वादातून कान्हरवाडीत तरुणाचा खून, ६ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 15:25 IST

दोन सख्या भावांवर हल्ला, अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून एकाचा खून केल्याची घटना

कडेगाव-सांगली: कान्हरवाडी तालुका कडेगाव येथे घडली आहे. ही थरारक घटना शनिवार दिनांक ३ जून रोजी  रात्री १० च्या सुमारास घडली.सचिन हणमंत मदने (वय ३२ रा.कान्हरवाडी ता.कडेगाव )असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खंडू हणमंत मदने (वय ३५) वर्षे हा गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी लक्ष्मण जगन्नाथ मदने,किरण लक्ष्मण मदने, सुरज संजय मदने,सौरभ संजय मदने ,करण गुलाब पाटोळे,महेंद्र बबन पाटोळे सर्व राहणार कान्हारवाडी  तालुका कडेगाव या सहा जणांविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी  कान्हारवाडी येथील सचिन हणमंत मदने (वय ३२) व खंडू हणमंत मदने (वय ३५) या दोघा भावांनी येरळा नदीपात्रातुन वाळूची खेप भरून आणली.या कारणावरून संशयित आरोपींनी शनिवारी रात्री १० च्या सुमारास  कान्हारवाडी हद्दीत येतगाव  रस्त्यावलगतच्या शेताजवळ  हातात धारदार हत्यारे घेऊन बेकायदेशीर जमाव जमवला. यावेळी संशयित आरोपी सुरज संजय मदने याने त्याच्या हातातील तलवारीने व किरण  लक्ष्मण मदने याने त्याच्या हातातील चाकूने सचिन हणमंत मदने यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पाठीवर वार केले.

यावेळी लक्ष्मण जगन्नाथ मदने याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने खंडू जगन्नाथ  मदने यांचे खांद्यावर व पायावर वार केले.यावेळी सौरभ संजय मदने ,करण गुलाब पाटोळे, महेंद्र बबन पाटोळे  यांनी हातातील लोखंडी गजाने तसेच लाकडी दांडक्याने सचिन व खंडू यांना मारहाण केली.यामुळे सचिन हणमंत मदने (वय ३२) याचा औषधोपचारापूर्वीच मृत्यू झाला. खंडू हणमंत मदने हा  गंभीर जखमी झाला आहे. सपोनि संतोष गोसावी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगली