शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात 'मुळशी पॅटर्न'! किरकोळ वादातून एकाची कोयत्याने हत्या, तर एका तरुणावर गोळीबार, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 10:22 IST

किरकोळ वादातून पाठलाग करून कोयत्याने हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशतीत वाढत होताना दिसत आहे. अशातच पुन्हा एखदा पुण्यात मुळशी पॅटर्न चित्रपटाचा थरार पाहायला मिळाला. पुण्यातील गणेश पेठेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पाठलाग करून कोयत्याने हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. तर दुसरीकडे किरकोळ कारणावरून पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे.  

पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार किरकोळ कारणावरून पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार करण्यात आला आहे.  हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. निलेश पिंपळकर असे फिर्यादीचे नाव आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे असे आरोपींचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील बाणेर भागात असलेल्या महाबळेश्वर हॉटेल जवळ घडला.पोलिसांना घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा एक जिवंत राऊंड आणि दोन  केसेस जप्त केल्या आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे