शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

मेट्रोमधील गर्दीचा गैरफायदा घेत तरुणीचा विनयभंग; CCTV च्या मदतीनं नराधमाला अशी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 09:12 IST

ब्लूलाईन मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत मुलीचा विनयभंग आणि गैरकृत्य केल्याप्रकरणी मेट्रो पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

नवी दिल्ली-

ब्लूलाईन मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत मुलीचा विनयभंग आणि गैरकृत्य केल्याप्रकरणी मेट्रो पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संजीव कुमार (३९, रा. कृष्णा नगर) असं आरोपीचं नाव आहे. तरुणीच्या लेखी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध यमुना डेपो मेट्रो पोलिस ठाण्यात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मेट्रोचे डीसीपी जितेंद्र मणी यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ एप्रिल रोजी एका तरुणीनं यमुना डेपो येथील मेट्रो पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. तरुणीनं पोलिसांना सांगितलं की, ती कड़कड़डूमा येथून ब्लूलाइन मेट्रोमध्ये चढली होती. त्यावेळी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. त्यानंतर कोचमध्ये तिच्या जवळ उभा असलेला एक तरुण तिच्या अगदी जवळ आला आणि त्यानं गर्दीचा गैरफायदा घेत छेडछाड सुरू केली. त्यानं अनुचित स्पर्श करण्यास सुरुवात केली. तरुणीनं आक्षेप घेतला, मात्र तरुणानं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तरी त्याचा नालायकपणा थांबला नाही. मुलगी अस्वस्थ झाली आणि तिनं ट्रेन थांबवण्याचा विचार केला, परंतु डब्यातील आपत्कालीन बटण तिच्या आवाक्याबाहेर होतं.

अर्ध्यावरच सोडला मेट्रो प्रवासदरम्यान, यमुना बँक मेट्रो स्टेशनवर येताच तरुणी ट्रेनमधून खाली उतरली. त्यानंतर विनयभंग करणारा तरुणही ट्रेनमधून खाली उतरून तिच्या मागे आला. त्यानं पीडित तरुणीशी बोलण्याचाही प्रयत्न केला, मात्र तरुणीनं त्याला टाळण्याचा प्रयत्न करत केला. त्याचवेळी एका महिला प्रवाशानं पोलिसांना फोन केला, मात्र पोलिस तिथं पोहोचण्यापूर्वीच आरोपी पळून गेला. त्यानंतर मुलीनं संपूर्ण माहिती पोलिसांना दिली, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला बेड्याआरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी डीसीपी जितेंद्र मणी यांनी मेट्रो युनिटच्या विशेष कर्मचार्‍यांचं पथकही या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलं. विशेष कर्मचार्‍यांचे प्रभारी निरीक्षक अजय कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकानं तरुणीकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. कड़कड़डूमा आणि यमुना बँक मेट्रो स्थानकांवर ट्रेनच्या डब्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर आरोपीची माहिती काढण्यात आली आणि त्याला प्रीत विहार मेट्रो स्टेशनवरुन अटक करण्यात आली. आपल्या बचावात आरोपीनं आपण जाणूनबुजून काहीच केलेलं नाही असा युक्तिवाद केला. मेट्रोमध्ये जास्त गर्दी आणि भांडणामुळे त्यानं मुलीला धडक दिली होती, परंतु मुलीनं तिच्या तक्रारीत अतिशयोक्ती केली आहे असा दावा आरोपीनं केला आहे.

टॅग्स :Metroमेट्रोCrime Newsगुन्हेगारी