अचानक घरात घुसला, म्हणाला मला तू आवडतेस...; संधी साधून महिलेचा विनयभंग
By देवेंद्र पाठक | Updated: March 30, 2023 16:23 IST2023-03-30T16:21:50+5:302023-03-30T16:23:38+5:30
धुळे तालुक्यातील घटना, एकाविरोधात गुन्हा

अचानक घरात घुसला, म्हणाला मला तू आवडतेस...; संधी साधून महिलेचा विनयभंग
धुळे - घरात एकटी असल्याची संधी साधून गावातील एकाने घरात प्रवेश करुन महिलेचा विनयभंग केला. ही बाब कोणाला सांगितल्यास पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देखील त्याने दिली. ही घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे तालुक्यातील एका गावात पती-पत्नी वास्तव्यास आहे. पती काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांची पत्नी घरी एकटी होती. घरात तिच्याशिवाय कोणीही नसल्याची संधी साधून त्याने घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिच्या इच्छेविरोधात साडी ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केेले. मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तू माझ्याशी बोलत नाही. मला तू आवडते असे बोलून तिचा विनयभंग केला. याशिवाय ही बाब कोणाला सांगितल्यास पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरडा ओरड झाल्याने संशयित घटनास्थळावरुन पसार झाला. पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर घाबरलेल्या पत्नीने ही बाब त्याला सांगितली. स्वत:ला सावरत तिने धुळे तालुका पोलिस ठाणे गाठत बुधवारी रात्री १० वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन घटनेचा तपास करीत आहे.