शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शॉकींग! विधवा महिलेच्या डोळ्यात मिरची टाकून विवस्त्र करीत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 05:51 IST

मुखेड शहराजवळील हुलगुडवाडी येथील खळबळजननक घटना, ५ जणांविरुद्ध गुन्हा

मुखेड (जि. नांदेड) तालुक्यातील शिरूर द.ये. येथील एक ३२ वर्षीय विधवा महिला आपल्या माहेरी हुलगडवाडी येथे पित्राच्या जेवणाच्या कार्यक्रमास आली असता हुलगुडवाडी येथील पाच जणांनी अनैतिक संबंधाचा राग धरून या महिलेच्या डोळ्यांत, तसेच अंगावर मिरची टाकून विवस्त्र करीत मारहाण केली.

याप्रकरणी मुखेड पोलिसांत २१ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, तालुक्यातील शिरूर दबडे येथील ही महिला माहेरी हुलगुडवाडी येथे आली असता १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान तिच्या वडिलांच्या घरात घुसून तिला या आरोपींनी जाब विचारला. तू आमच्या नातेवाईक तरुणीचा संसार खराब करते आहेस म्हणून मारहाण करून तिला घरातून ओढत रस्त्यावर आणले व तिच्या अंगावर व डोळ्यात मिरची पावडर टाकून जातिवाचक शिवीगाळ करून विवस्त्रही केले.

ही घटना मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनीच घडली. पीडित महिलेवर १७ तारखेपासून २० सप्टेंबरदरम्यान दवाखान्यात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होतच मुखेड पोलीस स्टेशन येथे येऊन दि.२१ रोजी तिने तक्रार दिली. यावरून आरोपींविरुद्ध विविध कलमांसह अनु. जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पाचही आरोपी झाले पसार

मारोती खांडेकर, परमेश्वर खांडेकर, व्यंकट खांडेकर, नागेश खांडेकर, मसणाजी खांडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, ते पसार झाले आहेत. पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडPoliceपोलिस