शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळिमा! कामाच्या बहाण्याने राजस्थानला बोलावून महाराष्ट्रातील तरुणीवर १० दिवस सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:11 IST

इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामासाठी महाराष्ट्रातून बोलावलेल्या एका तरुणीला तब्बल १० दिवस एका फार्म हाऊसवर ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामासाठी महाराष्ट्रातून बोलावलेल्या एका तरुणीला तब्बल १० दिवस एका फार्म हाऊसवर ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने सुखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

कामाचे आमिष दाखवून बोलावले 

पीडित तरुणी महाराष्ट्रात इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. तक्रारीनुसार, साधारण एक महिन्यापूर्वी उदयपूरमधील करण (नाव बदलले आहे) नावाच्या एका तरुणाने तिला फोन केला होता. उदयपूरमधील एका मोठ्या लग्नाच्या समारंभात इव्हेंटचे काम असल्याचे आमिष त्याने दाखवले. या कामासाठी तरुणी उदयपूरला पोहोचली असता, तिला एका सुनसान भागातील फार्म हाऊसवर नेण्यात आले.

अनैतिक कामासाठी टाकला दबाव 

पीडितेने सांगितले की, त्या फार्म हाऊसवर आधीच काही मुली होत्या. १० दिवसांनी काम सुरू होईल, असे सांगून तिला तिथेच थांबवण्यात आले. मात्र, अचानक आरोपी करणने तिला एका अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. या धक्कादायक मागणीला तरुणीने कडाडून विरोध केला. विरोध केल्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला एका खोलीत कोंडून ठेवले.

नशेत धुंद होऊन अत्याचार 

दोन दिवसांपूर्वी पीडित तरुणी खोलीत एकटी असताना आरोपी करण त्याच्या दोन मित्रांना घेऊन तिथे आला. तिघेही नशेत धुंद होते. त्यांनी पुन्हा तरुणीवर दबाव टाकला आणि नकार दिल्यावर तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. एवढेच नाही तर, या प्रकाराबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही तिला देण्यात आली.

पोलीस कारवाई आणि तपास 

तरुणीने कशीबशी तिथून सुटका करून घेतली आणि थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आपली आपबिती सांगितली. या घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक उमेश ओझा आणि सुखेर पोलीस पथकाने तातडीने हालचाली करत मुख्य आरोपी करण आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

"आम्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रासह राजस्थानमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Woman Drugged and Gang-Raped for 10 Days in Rajasthan

Web Summary : A Maharashtra woman was lured to Rajasthan for event work and held captive. She was drugged and repeatedly gang-raped for ten days. Police have arrested two suspects and are searching for a third.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान