बुलढाण्यात प्रतिष्ठित डॉक्टराला ब्लॅकमेल करून लुटले; 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2023 15:09 IST2023-10-20T15:09:29+5:302023-10-20T15:09:52+5:30
प्रकरणी या युवकांवर खंडणी, दरोड्यांसह विविध कलमांव्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाण्यात प्रतिष्ठित डॉक्टराला ब्लॅकमेल करून लुटले; 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बुलढाण्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टराला ब्लॅकमेल करून साडे आठ लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून 8 युवकांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपासचक्रे फिरवत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अजय नागपुरे, दीक्षांत नावघरे, विशाल गायकवाड, सूरज पसरटे, आदेश राठोड या आरोपींना अटक करण्यात आले असून दोन ते तीन आरोपींच्या पोलीस शोधत आहेत. या प्रतिष्ठित डॉक्टराला या टोळक्या युवकांनी कॅन्सरचा रुग्ण तपासण्यासाठी शहरातील खांमगाव रोडवरील एका घरात बोलवून त्याच्या गळ्याला सुरा लावून मारहाण केली व परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली व वेळोवेळी डॉक्टरांकडून साडे आठ लाख रुपये लुटले आहे. प्रकरणी या युवकांवर खंडणी, दरोड्यांसह विविध कलमांव्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.