शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 06:33 IST

बाळाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वतःच्या फायद्यासाठी आई-वडिलांनीच आपल्या हसनैन या दीड वर्षाच्या बाळाला एका गे जोडप्याला विकल्याची घटना घडली. याप्रकरणी डीएननगर पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. त्यात एका तृतीयपंथीयाचाही समावेश असून, बाळाची सुखरूप सुटका करण्यातही त्यांना यश मिळाले आहे. नजमीन शेख (बाळाची आई), तिचा पती मोहम्मद आझाद शेख उर्फ बादशाह, एजंट सकीनाबांनो शेख, राबिया परवीन अन्सारी, सायबा अन्सारी आणि इंद्रदीप उर्फ इंदर हरिराम मेहरवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नजमिनने डी एन नगर पोलिस ठाण्यात तिच्या बाळाची विक्री झाल्याची तक्रार दिली. तिच्या म्हणण्यानुसार, शेजारीन असलेल्या सकिनाने तिचा साहेब चित्रपट क्षेत्रात हसनैनला काम मिळवून देईल. त्या बदल्यात दिवसाचे तुम्हाला २ ते ३ हजार रुपये मिळतील, असे सांगितले. ती भेटायला गेल्यावर सायरबाने माझ्या मुलाला घेत मला १० हजार रुपये दिले. मात्र काही दिवस होऊनही त्यांनी मुलाला परत आणले नसल्याने मी त्यांना जाब विचारला. त्यावर त्यांनी पुन्हा काही रक्कम माझ्या हातावर ठेवत तुमचा मुलगा तुम्हाला मिळणार नाही, आम्ही त्याला विकले आहे, असे सांगितले. नजमिनच्या तक्रारीवरून, परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंदर मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देसले, सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार, उपनिरीक्षक सीमा खान, कॉन्स्टेबल स्मिता पेडणेकर, हेड कॉन्स्टेबल गोविंद पवार, कॉन्स्टेबल वारे, लाडे या पथकाने तपास सुरू केला. तपासात ते पनवेलमध्ये मेहरवालपर्यंत पोहोचले तेव्हा सत्य काही वेगळेच निघाले.

सायबानेच आम्हाला बाळ विकले!

मेहरवालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सायबाने त्यांना ४.६५ लाखांना हसनैनला विकले होते. त्यानुसार पोलिसांनी सायबा आणि अन्य आरोपीकडे चौकशी केली. तेव्हा मुलाचे आई-वडील नजमीन आणि आझाद यांनीच सायबा, राबिया व सकिना या एजंटच्या मदतीने पोटच्या पोराला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र मुलाची पुन्हा आठवण येऊ लागल्याने नजमीनने पोलिस ठाण्यात धाव घेतली असे तिचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक