शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबईतील आईच्या हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, पोलीस चौकशीत वेगळाच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 14:53 IST

रिम्पलने चाळीखाली असलेल्या मेडिकलमधून काही दिवसांपूर्वी फिनाइल आणि काही वस्तू मागवल्या होत्या

मुंबई - लालबाग परळ येथील वीणा जैन यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची मुलगी रिम्पल जैनला अटक केली आहे. सध्या न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून मृत्युप्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे. काहीही कारण नसताना आई वारंवार टोकायची. यामुळे ती अस्वस्थ झाली होती. अशात दुसरीकडे, तिच्या आईचा शिड्यांवरून खाली पडून मृत्यू झाल्याचे रिम्पलने पोलिसांना सांगितले. त्यामुळे, या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. 

रिम्पलने चाळीखाली असलेल्या मेडिकलमधून काही दिवसांपूर्वी फिनाइल आणि काही वस्तू मागवल्या होत्या. त्यामुळे मेडिकलवाल्याचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचप्रमाणे २७ डिसेंबरला आई पहिल्या मजल्यावरून पडली असे रिम्पलने पोलिसांना सांगितले. त्यावेळी चाळीखाली असलेल्या फ्लेव्हर्स ऑफ चायनीज या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हबीब आणि रोहित या दोन मुलांच्या मदतीने रिम्पलने आईला घरी आणले. त्याच दिवशी वीणा जैन यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. आता, रिम्पलनेही शिडीवरुन पडल्यानेच आईचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. 

काहीही कारण नसताना आई वारंवार मला टोकायची. त्यामुळे मी अस्वस्थ झाली होती. अशात आईचा शिड्यांवरून खाली पडून मृत्यू झाला. तेव्हा आरोपाच्या भीतीने आईच्या मृतदेहाचे ५ तुकडे केल्याचा खुलासा रिम्पलने पोलिसांच्या चौकशीत केला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा असून, त्यानंतरच वीणा यांची हत्या झाली की त्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडल्या, याची ठोस माहिती समोर येईल. दरम्यान, काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा चौकशी केली. 

पोलिसांकडून सँडविचवाल्याचीही चौकशी

काळाचौकी पोलिसांकडून अमजद अली उर्फ बॉबीकडेही चौकशी सुरू आहे. तो लालबागमध्ये सँडविच विकण्याचे काम करायचा. रिम्पल आणि तिची आई त्याच्याकडून नेहमी सँडविच घ्यायच्या. त्यावेळी तिची अमजदशी ओळख झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तो ७ जानेवारीला सँडविच स्टॉल बंद करून लखनौनजीकच्या आपल्या मूळ गावी गेला होता. तेव्हापासून तो रिम्पलच्या संपर्कात होता. त्यांचे चॅटिंग सुरू होते. तसेच, माटुंगा येथील एका चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्याही ती सतत संपर्कात होती. या तरुणाचीही पोलिस चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस