शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण; टाकले कुंटणखाण्यात

By परिमल डोहणे | Updated: September 19, 2022 22:20 IST

ब्रह्मपुरीतील दाम्पत्याला अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चंद्रपूर : देहव्यापारासाठी कोलकाता येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. त्या मुलीला जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलण्यात आले. दलालांनी विविध शहरांत तिच्याकडून देहव्यवसाय करून घेतला. अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने त्या अल्पवयीन मुलीची ब्रह्मपुरी शहरातून सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध गुन्ह्यांखाली मालडोंगरी (ता. ब्रह्मपुरी) येथील मंजित रामचंद्र लोणारे (वय ४०), चंदा मंजित लोणारे (३२) या दाम्पत्याला अटक केली आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोलकाता येथून अपहरण करून तिच्याकडून जबरदस्तीने देहव्यवसाय करण्यात येत असल्याची तक्रार नागपुरातील एका सामाजिक संस्थेने चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे केली. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांची दोन पथके गठित केली. या पथकाने ब्रह्मपुरी गाठून मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलनी बंगला क्रमांक १४ येथे बनावट ग्राहक पाठवून शाहनिशा केली. बनावट ग्राहकाने इशारा करताच बंगल्यावर धाड टाकली. यावेळी कोलकाता येथून देहव्यापारासाठी अपहरण केलेल्या एका मुलीची पोलिसांनी सुटका केली.

या प्रकरणात मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेल्या मंजित रामचंद्र लोणारे, चंदा मंजित लोणारे या दाम्पत्यावर कलम ३७०, ३७० (ए), सहकलम ३, ४, ५, ६, ७ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ सहकलम ४, ६, ८, १२ अन्वये अटक केली आहे. त्या मुलीकडून नागपुरातील दलालांनी वेगवेेगळ्या ठिकाणी देहव्यवसाय करून घेतल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, एसडीपीओ मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक मनोज गजबे, एपीआय संदीप कापडे, एपीआय मंगेश भोयर, राजेंद्र खनके, स्वामीदास चालेकर, गणेश भोयर, गोपिनाथ नरोटे, प्रदीप मडावी आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी