शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:58 IST

Bihar Crime News: प्रियकर जेव्हा प्रेयसीला भेटायला गेला तेव्हा चित्र काहीसं वेगळंच होतं...

हल्लीच्या युगात कधी काय घडेल सांगू शकत नाही. प्रेमप्रकरण किंवा विवाहबाह्य संबंध या गोष्टी आणि त्यावरून झालेले गुन्हे सर्रास कानावर येतात. कधी एखादी विवाहित महिला तरूणाच्या प्रेमात पडल्याची बातमी प्रसिद्ध होते तर काही वेळा एखादा विवाहित पुरूष वयाने लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात काहीही करायला तयार असल्याच्या बातम्याही दिसतात. काही वेळा दोन पुरूष आणि महिला दोघेही विवाहित असून आपापल्या साथीदारांना फसवून प्रेमप्रकरण रंगवताना दिसतात. असेच एक विवाह्यबाह्य संबंधांचे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे.

नेमका काय घडला प्रकार?

बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यात एका प्रियकराला त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटायला जायचे होते. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी भेट होणार होती. ही घटना काको ब्लॉकच्या भेलावार ओपी परिसरातील रामदानी गावात घडली. रात्री उशिरा प्रियकर हळूच लपूनछपून प्रेयसीला भेटायला गेला. नेहमीच्या ठिकाणी भेटायचं ठरलं. पण जेव्हा प्रियकर प्रेयसीला भेटायला गेला, तेव्हा लोकांनी प्रियकराला रंगेहाथ पकडले

गावकऱ्यांच्या तावडीत सापडला प्रियकर; पोलिसही आले...

प्रियकर गावकऱ्यांच्या तावडीत सापडताच त्याला सर्वांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. शेकडो लोक जमले आणि त्या तरुणाला घरात पकडून ठेवण्यात आले. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण लोक कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार नव्हते. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी यावे लागले. खूप प्रयत्नांनंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या तावडीतून प्रियकराची सुटका केली. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही  विवाहित असल्याचे चौकशीत समोर आले.

प्रियकराला चोप, रुग्णालयात दाखल

गावकऱ्यांनी प्रियकराला मारहाण करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी जहानाबादच्या सदर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रियकर आणि प्रेयसीमध्ये कथित अवैध संबंध असल्याचे सांगितले जात आहे. गावकऱ्यांना याची आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस