शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट अटॅकचं नाटक रचलं, पण एका संशयाने उलगडा झाला; दत्तक घेऊन ज्याचा सांभाळ केला त्याने आईला संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:23 IST

शिक्षण विभागात प्रथम श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या जयलक्ष्मी यांना त्यांच्याच मुलाने संपवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडावा, अशी एक भयंकर घटना तुमकुरु जिल्ह्यातील जोगीहल्ली गावात उघडकीस आली आहे. शिक्षण विभागात प्रथम श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या जयलक्ष्मी यांची त्यांच्याच सख्या बहिणीने आणि दत्तक पुत्राने गळा आवळून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, या दोघांनीही ही हत्या नसून 'हार्ट अटॅक' असल्याचे भासवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या चौकस नजरेतून ते सुटू शकले नाहीत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जयलक्ष्मी या बीईओ कार्यालयात सरकारी नोकरीला होत्या. त्यांच्या पतीचे २० वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यांना स्वतःचं अपत्य नसल्यामुळे त्यांनी आपली सख्खी बहीण अनुसूया हिचा मुलगा चंद्रशेखर याला दत्तक घेतले होते. त्याला त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे लहानाचं मोठं केलं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून घरात सुरू असलेल्या वादाचा शेवट इतक्या भीषण हत्येत होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.

हार्ट अटॅकचा बनाव अन् पोलिसांचा संशय

जयलक्ष्मी यांचा मृत्यू झाला तेव्हा आरोपींनी आरडाओरडा करून हा हृदयविकाराचा झटका असल्याचा बनाव रचला. अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती. मात्र, जयलक्ष्मी यांचे निकटवर्तीय श्रीनिवास यांना या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी तातडीने चिक्कनायकनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी बहीण आणि मुलाला ताब्यात घेतले.

हत्येमागचं नेमकं कारण काय?

पोलीस तपासात समोर आलेले कारण अंगावर शहारे आणणारे आहे. जयलक्ष्मी यांचे श्रीनिवास यांच्याशी जवळचे संबंध होते आणि त्या त्यांच्यासोबत राहत होत्या. मात्र, आठ महिन्यांपूर्वी बहीण अनुसूया आणि मुलगा चंद्रशेखर हे जयलक्ष्मी यांच्या घरी राहायला आले. त्यांनी श्रीनिवास यांना घरातून हाकलून दिले. या त्रासाला कंटाळून जयलक्ष्मी यांनी लवकरच दुसरे घर घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.

आपल्या हातातून संपत्ती जाईल आणि वेगळे राहिल्यावर जयलक्ष्मी यांच्या सरकारी नोकरीचा वारसाहक्क मिळणार नाही, या भीतीने बहीण-भावाच्या जोडीने रात्रीच्या सुमारास जयलक्ष्मी यांचा गळा आवळून काटा काढला.

नात्याचा निर्घृण शेवट

पोलिसांनी अनुसूया आणि चंद्रशेखर या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ज्या मावशीने आईच्या मायेने वाढवले, तिच्याच मृत्यूची सुपारी घेणाऱ्या या मुलाच्या कृत्याने संपूर्ण कर्नाटक हादरले आहे. आर्थिक लाभ आणि सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Adopted son kills mother for property, stages heart attack.

Web Summary : In a shocking incident, a woman was murdered by her sister and adopted son, who then tried to fake a heart attack. Suspicion arose, leading to the arrest of the pair, motivated by property and inheritance.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक