शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मासे कापण्याच्या सुऱ्याने कापले मित्राचे शीर; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 08:32 IST

पैशांच्या वादावरून केली हत्या; भोपाळमध्ये रेल्वेतून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : पैशांच्या वादातून मासे कापण्याच्या सुऱ्याने मित्राचे शिर कापून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या शफिक अली हैदर या इसमाला पनवेल शहर पोलिसांनी उत्तर प्रदेशात जात असताना भोपाळ येथून अटक केली. २८ जून रोजी पनवेल येथील मोहम्मद अस्लम हाशमद (४२, राहणार आशियाना अपार्टमेंट, जुन्या कोर्टजवळ, पनवेल) हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली होती. त्यानुसार पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बजरंग राजपूत व त्यांचे पथक तयार केले होते. या हरवलेल्या व्यक्तीच्या शोधात मोबाइलचे सीडीआर व सीसीटीव्ही फूटेज यांचा तांत्रिक तपास पोलिसांनी केला. 

तपासादरम्यान हरवलेल्या व्यक्तीला त्याचा मित्र शफिक हैदर याच्यासोबत शेवटचे पाहिले असल्याबाबत माहिती मिळाली. याच्याविषयी तपास केला असता तो वडघर पनवेल येथून त्याचा मोबाइल बंद करून मूळ गावी उत्तर प्रदेशात जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला भोपाळ मध्य प्रदेश येथे रेल्वेत त्याला विचारपूस करण्यासाठी थांबवले. तपासात त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच मोहम्मद हशमद याच्याबरोबर पैशाच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा व शिवीगाळीचा राग मनात धरून त्याच्या मानेवर मासे कापण्याच्या सुऱ्याने वार करून त्याचे मुंडके धडावेगळे करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली. 

दोन ठिकाणी लावली मृतदेहाची विल्हेवाटखुनाचा पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचे धड नायलॉनच्या गोणीत भरून प्रेत चिंचपाडा कळंबोली सर्विस रोडच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला टाकून दिले, तर मुंडके करंजाडे येथील नाल्यात टाकल्याचे त्याने सांगितले. आरोपीने सांगितल्याप्रमाणे मयताचे धड आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस