शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरुन घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 22:29 IST

किरण नामदेव शिंदे ( वय २३ वर्षे, रा.बावडा वेस नाका, माळीगल्ली, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे.

इंदापूर  : किरकोळ कारणावरुन नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील सावतामाळीनगरमधील बावडा वेस नाक्याजवळ आज ( दि.८) साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणातील आरोपीची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याची ही चर्चा आहे. वृत्त लिहीपर्यंत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरु होते.    किरण नामदेव शिंदे ( वय २३ वर्षे, रा.बावडा वेस नाका, माळीगल्ली, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात सुधीर किसन पारेकर (वय ३० वर्षे, रा. वनगळी,ता.इंदापूर), राजेश हरीदास शिंदे ( वय ५४ वर्षे,रा. सावतामाळीनगर,इंदापूर) हे दोघेजण जखमी झाले आहेत. पारेकर यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. तर शिंदे यांच्या दंडावर व हातावर जखम झाली आहे. या संदर्भात पारेकर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली माहिती अशी की, पारेकर हे नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ठेकेदार म्हणून काम करतात. ते बावडा वेस नाक्यालगतच्या भागात डास निर्मुलनासाठी धुरळणीचे काम करुन घेत होते. 

आरोपी किरण शिंदे याने त्यांच्याकडे जावून धुरळणी यंत्र मागितले. यंत्र गरम झाल्याने ते देण्यास पारेकर यांनी नकार दिल्याने आरोपीने चिडून त्यांच्या कपाळावर कोयत्याने वार केला. त्या नंतर त्याच भागातील माजी नगरसेवक राजेश शिंदे यांनी यापूर्वी आपल्या वडीलांना केलेल्या शिवीगाळीचा राग धरुन आरोपीने, त्यांच्या ही हातावर व दंडावर कोयत्याने वार केले. ही घटना समजल्यानंतर आरोपीस पकडण्यात आलेल्या पोलिसांबरोबर देखील आरोपीची बाचाबाची झाली, असे वृत्त आहे. पारेकर यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी