शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहपोलीस आयुक्तांना आलेल्या बॉम्बस्फोटाच्या कॉलप्रकरणी गुन्हा दाखल, तपास सुरू

By मनीषा म्हात्रे | Updated: February 16, 2023 15:22 IST

१२ फेब्रूवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास प्रवीण पडवळ यांना अनोळखी व्यक्तीने कॉल केला.

मुंबई : गेल्या काही दिवसांत बॉम्बस्फोटाच्या कॉलचे सत्र सुरूच आहे. यातच वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना थेट अनोळखी व्यक्तीने कॉल करून मीरा भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असून पोलीस पाठवा, असा कॉल केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबईपोलिसांसह मीरा भाईंदर पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपीने आपण आमदार यशवंत माने असून मिरा-भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ फेब्रूवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास प्रवीण पडवळ यांना अनोळखी व्यक्तीने कॉल केला. तसेच, "तो आमदार यशवंत माने बोलत असल्याचे सांगून मीरा भाईंदर येथे बॉम्ब स्फोट  होणार असून तात्काळ पोलीस पाठवा" असे म्हटले होते.    यासंदर्भात अधिक विचारणा करताच, त्याने माहिती न देता शिवीगाळ केली होती. तसेच याबाबत सतत कॉल सुरु होते.

पडवळ यांनी तात्काळ याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष आणि मीरा भाईंदर येथील नियंत्रण कक्षास माहिती दिली. तसेच, याबाबत गुन्हे शाखेलाही माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातूनही त्याला कॉल केले. मात्र त्याच फोन सतत व्यस्त येत होता. या कॉलनंतर मीरा भाईंदर येथील महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 

गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने(सीआययू) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीआययू याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. आमदार यशवंत माने यांचा मोबाईल क्रमांकावरून आल्याचे भासवण्यात आले होते. त्यासाठी आरोपीने तंत्रज्ञानाची मदत घेतल्याचा संशय आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMira Bhayanderमीरा-भाईंदर