शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आधी हात-पाय बांधले, नंतर विहिरीत दोरीने लटकवलं; १३ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 09:39 IST

मुलाचा शोध घेत शेतात पोहोचताच संपूर्ण कुटुंब हादरलं. कारण शेतातील विहिरीत लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

जयपूर : राजस्थानातील टोंक इथं एका अल्पवयीन मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. १३ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. तसंच पोलिसांकडून सदर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय अमरिश हा शनिवारी शाळा सुटल्यानंतर शेतात जातो, असं सांगून सायकलवर घराबाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी अमरिशचा शोध सुरू केला. मात्र शेतात पोहोचताच संपूर्ण कुटुंब हादरलं. कारण शेतातील विहिरीत लटकलेल्या अवस्थेत अमरिशचा मृतदेह आढळून आला. तसंच त्याचे हात-पायही बांधण्यात आले होते. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याचा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवरच 'कांड'?; अज्ञातानं दिलं विष, हॉस्पिटलमध्ये असल्याची चर्चा

अल्पवयीन तरुणाच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी अमरिशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वादातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र माझ्या मुलाचा कोणाशीही वाद नसल्याचं अमरिशच्या वडिलांनी म्हटलं आहे. शेतात त्याने एखादी अशी घटना पाहिली असेल ज्याबद्दल त्याने घरी येऊन सांगू नये, यासाठी त्याला संपवण्यात आलं असू शकतं, असा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक राजर्षी राज यांनी सांगितलं की, "या मुलाची हत्या झाल्याचं स्पष्ट आहे. याप्रकरणी आम्ही युद्धपातळीवर तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करू." 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी