नवी मुंबई : सीबीडी येथील एका स्पामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची घटना उघडकीस आली आहे. या कुंटणखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. सीबीडी येथील या स्पामधून १५ महिलांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे यात थायलँडच्या दोन महिलांचा समावेश होता. याप्रकरणी दोघांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी देहविक्री चालत असल्याचे अनेकदा पोलिसांच्या कारवायांमधून दिसून आले आहे. याठिकाणी विदेशी महिलांकडूनदेखील देहविक्री करून घेतले जात असल्याचे समोर आले आहे. सीबीडी सेक्टर १५ येथील सिटी टॉवरमधील मॅजिक मोमेंट टच स्पामध्ये देहविक्री चालत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने कारवाई केली.
वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्रीखोल्या तयार केल्या असून ग्राहकांना पुरवण्यासाठी ठेवलेल्या १५ महिला मिळून आल्या. त्यामध्ये दोन महिला थायलँडमधील असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी स्पाचालक मंगेश बांदोडकर व कामगार पंकज माने यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईत इतरही अनेक ठिकाणी अशा प्रकारे स्पामध्ये देहविक्री सुरू असून त्याठिकाणीदेखील विदेशी महिलांची भुरळ घालून ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Web Summary : A prostitution ring operating under the guise of a spa in Navi Mumbai has been busted. Police rescued 15 women, including two from Thailand. Two individuals have been arrested. The spa was allegedly luring customers with foreign women.
Web Summary : नवी मुंबई में एक स्पा की आड़ में चल रहे वेश्यावृत्ति रैकेट का भंडाफोड़ किया गया। पुलिस ने थाईलैंड की दो महिलाओं सहित 15 महिलाओं को बचाया। दो व्यक्तियों को गिरफ्तार किया गया है। स्पा पर विदेशी महिलाओं से ग्राहकों को लुभाने का आरोप है।