शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! गँगरेपनंतर मुलीचे हातपाय तोडले अन् मृत समजून तिला जंगलात फेकले, मात्र अचानक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 09:29 IST

जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहचलो तेव्हा बहिणीची अवस्था खूप बिकट होती. २ मिनिटे ती शुद्धीवर आली त्यानंतर पुन्हा बेशुद्ध झाली असं तिच्या भावाने सांगितले.

आग्रा - शहरातील एका मुलीसोबत अमानुष कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी एक मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळली. माहिती मिळताच कुटुंबीय आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. घाईघाईत मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, ती अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाहीत. नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. 

या मुलीचे हातपाय तोडून आणि तिला जंगलात फरफटत नेले. गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलगी मृत समजून आरोपी फरार झाले. ती रात्रभर जंगलात त्याच अवस्थेत पडून राहिली. जरा भान आल्यावर ती कशीतरी जंगलातून रेंगाळत रस्त्यावर पोहोचली. पोलिसांनी भावाच्या तक्रारीवरून बलात्काराचा FIR दाखल केला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी मुलगी मावशीच्या घरी जायला निघाली होती. परंतु तिथे पोहचली नाही. ती होळी खेळत असावी असं कुटुंबाला वाटलं. संध्याकाळी ६ वाजले तरी मुलगी घरी परतली नसल्याने आई वडिलांना चिंता लागली. ती मावशीच्या घरी पोहचली नव्हती त्यामुळे तिचा शोध घेण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीला जंगलाशेजारील रस्त्यावर मुलगी जखमी अवस्थेत पडल्याचं दिसून आले. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. 

जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहचलो तेव्हा बहिणीची अवस्था खूप बिकट होती. २ मिनिटे ती शुद्धीवर आली त्यानंतर पुन्हा बेशुद्ध झाली. शरीरावर कपडे नव्हते. डोळ्यातून रक्त वाहत होते. गँगरेप करणाऱ्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडले होते. त्यानंतर तिला जंगलात फरफटत नेले. पाठ आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ती मेल्याचं समजून आरोपींनी तिला जंगलात फेकले. रात्रभर ती तिथेच पडली होती. सकाळी शुद्ध आली तेव्हा ती कशीबशी रस्त्यापर्यंत पोहचली असं पीडितेच्या भावाने म्हटलं. 

दरम्यान, मुलीच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. तिला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. भावाच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. पीडितेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न सुरू आहे जेणेकरून आरोपींची ओळख पटू शकेल. अद्याप पीडिता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिची तब्येत सुधारल्यानंतर जबाब नोंदवला जाईल अशी माहिती पोलीस अधिकारी आनंद कुमार शाही यांनी दिली. 

टॅग्स :Policeपोलिस