राजकुमार जाेंधळे
लातूर - शहरातील जवाहर नवाेदय विद्यालयात सातवीमधील एका विद्यार्थिनीने वसतिगृहात टाॅवेलने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता समाेर आली. अनुष्का किरणकुमार पाटाेळे (वय १२, रा. टाका ता. औसा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी शाळेतील दाेषींविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला.
नातेवाईकांच्या आक्राेशाने दिवसभर रुगणालय परिसरात तणावाचे वातावरण हाेते. रात्र झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. कुटुंबीयांनीही त्याला विराेध दर्शवत जाेपर्यंत गुन्हा दाखल हाेत नाही, ताेपर्यंत पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत कुठलाही नाेंद झाली, नसल्याचे पाेलिसांनी सांगितले. अनुष्काने जिथे गळफास घेतला त्या हाॅलमध्ये दाेन महिला कर्मचारी आणि १८ विद्यार्थिनी हाेत्या. काेणालाच कसे काय दिसले नाही? असा सवाल अनुष्काचे वडील किरणकुमार पाटाेळे यांनी केला आहे.
तसेच गावातील शिक्षक सुधारकर लाेहकरे म्हणाले, अनुष्का ही हुशार विद्यार्थिंनी हाेती. तिच्यावरील अन्याय प्रशासनाने दूर केला पाहिजे तर रवी पाटील यांनी शाळेतील दाेषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. रुग्णालय परिसरात आक्राेश करणारे आई-वडील म्हणाले, सकाळी ९ वाजता आम्हाला शाळेतून फाेन आला. तुम्ही तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात या. काय झाले आहे, ते सांगितले नाही. लपवा-छपवी केली. आम्हाला मृतदेहही दाखविला नाही. बसलेल्या स्थितीत गळफास कसा काय बसताे? असा सवाल आईचा हाेता. शासकीय रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली हाेती. दिवसभर आक्राेश सुरू हाेता.
दरम्यान, घटनेची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना कळल्यानंतर उपविभागीय अधिकारी राेहिणी नऱ्हे, तहसीलदार साैदागर तांदळे नवाेदय विद्यालयात पाेहोचले. घटनेची कसून चाैकशी केली जावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थी नवाेदयमध्ये शिकतात. त्यामुळे घटनेच्या मुळाशी जावून अनुष्काला न्याय मिळवून देणे, वस्तुस्थिती समाेर आणण्यासाठी समिती गठित केली आहे. टाका गावात इयत्ता पाचवीपर्यंत अनुष्काचे शिक्षण झाले. जवाहर नवाेदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी तिला प्रवेश मिळाला. अभ्यासात हुशार असलेल्या अनुष्काला शाळेतील शिक्षकांनी नवाेदय परीक्षेसाठी प्राेत्साहित केले.
शुक्रवारी आईला केला शेवटचा काॅल...
अनुष्काने शेवटचा काॅल शुक्रवार, २ जानेवारी राेजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास केला हाेता. तिने आईशी पाच मिनिटे संवाद साधला. ती हसून बाेलल्याचे आईने सांगितले. अनुष्काने काॅल केल्यानंतर आईला म्हणाली, मम्मी तू आणि अंटी मला शेंगदाण्याचे लाडू, बिस्कीट पुडे घेऊन ये. मी लग्नाला येते, मात्र माझी परीक्षा आहे. लग्न लावून लागलीच परत जाणार आहे.
Web Summary : A 12-year-old girl in Latur was found dead in her school hostel. Her family alleges foul play, demanding a murder investigation. The girl spoke to her mother happily before her death. Authorities are investigating the incident.
Web Summary : लातूर में 12 वर्षीय छात्रा स्कूल के छात्रावास में मृत पाई गई। परिवार ने हत्या की जांच की मांग करते हुए गड़बड़ी का आरोप लगाया है। मरने से पहले लड़की ने अपनी मां से खुशी से बात की थी। अधिकारी मामले की जांच कर रहे हैं।